Ticker

6/Breaking/ticker-posts

शेतकऱ्याच्या मदतीला पोलीस गेले धावून ;चोरी गेलेल्या मोटारी दिल्या आणून

  चोरी गेलेल्या 2 मोटार जप्त करून एकास अटक...



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

  साकत  : आज पर्यत अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील वस्तु चोरी जातात मात्र त्या सापडणे शक्य नसल्याने अनेक शेतकरी पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंद करीत नाहीत मात्र जामखेड तालुक्याची शेतकऱ्याची चोरीला गेलेली विहिरीवरील मोटारीचा गुप्त शोध घेऊन अरोपीस ही अटक त्यामुळे चक्क शेतकऱ्याच्या मदतील पोलीस त्यामुळे तालुक्याती शेतकऱ्यांना पोलीसावरी विश्वास वाढला आहे .

जून महिन्यात आरणगाव गावातील शेतकरी नाव मोहन रामदास कारंडे याचे मालकीच्या गट नंबर 81 मधील विहिरीतील 2 इलेक्ट्रिक मोटार चोरी गेलेल्या होत्या त्यावरून फिर्यादी नामें मोहन रामदास कारंडे यांचे फिर्यादी वरून जामखेड पो स्टे गु र न.286/2021 भा द वि कलम 379 प्रमाणे दिनांक 21/6/2021 रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर मोटार चोरी बाबत जामखेड पोलिसांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की सदर मोटारी या आरणगाव गावातीलच अमोल नाना निगुडे याने चोरल्या आहेत.अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड यांनी तात्काळ  गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना नमूद बातमीतील ठिकाणी रवाना करून अमोल नाना  निगुडे याला आरणगाव गावातच ताब्यात घेऊन त्याला पाणी उपसा करणाऱ्या मोटार बाबत विचारपूस केली असता त्याने 2 इलेक्ट्रिक मोटारी काढून दिल्या आहेत.

सदर गुन्ह्याचा तपास .पोलीस अधीक्षक  मनोज पाटील अ. नगर,.अपर पोलीस अधीक्षक  सौरभ अग्रवाल अ. नगर .उपविभागीय पोलीस अधिकारी  अण्णासाहेब जाधव साहेब, कर्जत विभाग,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड जामखेड पोलीस स्टेशन ,गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री राजू थोरात ,    पो ना अविनाश ढेरे ,पो कॉ आबासाहेब आवारे,पो कॉ संग्राम जाधव ,पो कॉ संदीप राऊत ,पो कॉ अरुण पवार ,पो कॉ कोळी यांनी केली आहे.पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शन खाली पो ना सय्यद हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या