जि.प.अध्यक्षा ना.सौ.राजश्री घुले पाटील यांच्या हस्ते
खावटी योजनेअंतर्गत ४८८ लाभार्थींना अन्नधान्य,किराणा साहित्य व रोख रकमेचे वाटप
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क
शेवगाव (जगन्नाथ गोसावी) :- लोकनेते (स्व.)मारुतराव घुले पाटील यांनी घालून दिलेल्या आदर्शवत पाऊलवाटेने व संस्काराप्रमाणे घुले कुटूंबिय सर्व जाती - धर्मातील लोकांना बरोबर घेऊन विकासाचे काम करीत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर आपण सर्वांच्या आरोग्यासांठी कोविड सेंटर, औषधे, लस उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील आहोत. अनुसूचित जमातीच्या नागरीकांनी लस घेतली नसेल तर, त्यांना प्राधान्याने लस उपलब्ध करुन देण्यात येईल. कोरोनाच्या तिस-या लाटेच्या अगोदर लस घेण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना.राजश्री घुले पाटील यांनी केले.
आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थींसाठी खावटी अनुदान योजनेतून शेवगाव तालुक्यातील ४८८ लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या अन्नधान्य, किराणा साहीत्य व रोख रक्कमेचे वाटप शुक्रवारी (दिं.१६ रोजी) शेवगाव पंचायत समिती सभागृहात ना.सौ.घुले यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी त्या बोलत होत्या. सभापती डाँ. क्षितीज घुले, तहसीलदार अर्चना भाकड- पागिरे, प्रभारी गटविकास अधिकारी शेखर शेलार, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, शिवाजी नेमाणे, सुरेश दुसंगे, सरपंच सर्वश्री प्रदिप काळे,संतोष धस, उज्ज्वला मेरड, समीर शेख, शिवाजी नरके, अरुण सोनवणे, शफीक शेख, लक्ष्मण कुसळकर, गोवर्धन वाघ आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते.
ना.सौ.घुले पुढे म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकारने अनुसुचित जमातीच्या कुटूंबियांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना सुरु केली असून या योजनेच्या माध्यमातून अनुसुचित जमातीच्या कुटूबियांची उपासमार होणार नाही. खावटी अनुदान योजनेतून तालुक्यातील पारधी समाजातील ८३, भूमीहीन २७६, मनरेगा ३५, विधवा ८२, घटस्पोटीत ७, अपंग ४ व वनहक्क १ अशा ४८८ लाभार्थ्यांना अन्नधान्य व किराणा साहीत्य व रोख दोन हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे .
डॉ.क्षितीज घुले म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांच्या प्रयत्नातून खावटी योजना सुरु झाली.ही योजना तळागाळागतील लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम आम्ही करीत आहोत. शेवगाव तालुक्यात अलीकडच्या काळात जातीपातीचे राजकारण करुन विष पेरण्याचे काम काही जण करीत आहेत. मात्र,आम्ही हे विष कधीह पेरु देणार नाही. यासाठी सर्वांनी एकसंघ उभे राहण्याची गरज आहे.
सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार यांनी विविध योजनेची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्तविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनिल बोरसे यांनी तर, सुत्रसंचालन आरोग्य विस्तार अधिकारी डाँ. सुरेश पाटेकर यांनी केले. सहाय्यक समन्वयक सुधीर सांगळे यांनी आभार प्रदर्शन केले.
0 टिप्पण्या