Ticker

6/Breaking/ticker-posts

दहावीचे गुणांकन पाहणाऱ्या शिक्षकांना जुंपले मतदार याद्यांचे कामाला; शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी

 मतदार याद्यांच्या कामासाठी शिक्षकांना नोटीसा


लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 मुंबईशालेय शिक्षक सध्या शाळांमध्ये जाऊन दहावीच्या गुणांकाचे काम करीत आहेत. दरम्यान बीएलओच्या कार्यासाठी उपस्थित न राहील्याने शिक्षकांना निवडणूक आयोगाकडून नोटीस मिळू लागल्या आहेत. यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.


एसएससी बोर्डाच्या निर्देशानुसार ११ जूनपासून शिक्षक शाळेत दहावी विद्यार्थ्यांचे गुणांकांचे काम करत आहेत. या कालावधीत शिक्षक बीएलओच्या कार्यासाठी निवडणूक कार्यालयात उपस्थित न राहिल्याने निवडणूक कार्यालयाकडून शिक्षकांना नोटीसा पाठविल्या आहेत. दहावीचे गुणांकांचे काम पूर्ण झाले असले तरी त्रुटी पुर्तेतेचे काम अजून काही दिवस सुरुच राहणार आहे. त्यामुळे मध्येच अशाप्रकारे नोटीसा मिळाल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

मुंबई मनपा निवडणूकीसाठी मतदार यादी बनवण्यासाठी शिक्षकांना जुंपले जात असल्याचा आरोप शिक्षक परिषदेने केला आहे. टार्गेट करून मतदार याद्या बनवायच्या आहेत. हे काम मनपा कर्मचारी यांना घेऊन करावे. मनपाकडे १ लाख कर्मचारी असताना खासगी शाळेतील शिक्षकच का हवेत? अन्यथा आँनलाईन शिक्षणासाठी सुट्टी देऊन मुलांचे नुकसान का? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

काही ठिकाणी शिक्षकांना ड्युटी दिली जाते, त्यानंतर शिक्षकेतर कर्मचारी पाठवण्यास सांगितले जाते पण अनेक शाळांमध्ये क्लार्क नसतात आणि रिक्त पदे देखील भरलेली नाहीत. क्लर्क नसलेल्या शाळांमधील शिक्षकांना स्वतः कारकूनी कामे करावी लागतात. कारकूनाची अनेक कामे बाहेरून करून घ्यावी लागतात १५ वर्षात शिपाई, प्रयोग शाळा कर्मचारी भरती करण्यात आली नाही . तर इतर कर्मचारी निवडणूक कामासाठी कसे उपलब्ध करून देणार? असा प्रश्न शिक्षक परिषदेने उपस्थित केलाय.

निवडणूक आयोग व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र देण्यात आले आहे. तरी देखील शिक्षकांवर निवडणूक मतदार यादी कामाची जबरदस्ती सुरुच आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद होऊ नये म्हणून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याची दखल घ्यावी' अशी मागणी शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या