Ticker

6/Breaking/ticker-posts

डोंबारी-बहुरुपी समाजाचं दु:ख स्वातंत्र्यानंतरही कायम- बाळासाहेब भुजबळ

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

  अ.नगर: आपली भुमी कोणती आणि आपलं आकाश कुठलं याची माहिती नसलेला भटके-विमुक्त समाज आजही पारंपारिक समाजरचनेप्रमाणे जगत आहे. डोंबारी-बहुरुपी समाजाचं दु:ख स्वातंत्र्यानंतरही तसंच आहे, अशी खंत महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी व्यक्त केली.

     नगर तालुक्यातील टाकळी काझी येथील भटके-विमुक्त जमातीमधील डोंबारी-बहुरुपी समाजाच्या पालावरील 16 कुटूंबातील लहान मुला-मुलींना केळी व बिस्किटे वाटप करुन महामंडळाचे प्रांत अध्यक्ष कल्याणाराव दळे यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी श्री.भुजबळ बोलत होते. याप्रसंगी जिल्हा महिलाध्यक्षा वनिता बिडवे, उपाध्यक्ष अनिल निकम, सचिव बापुसाहेब औटी, युवा अध्यक्ष निलेश पवळे, शहराध्यक्ष श्रीपाद वाघमारे, तसेच बारा बलुतेदार महासंघाचे कार्याध्यक्ष रमेश बिडवे, नाभिक समाज संघर्ष कृती समिती प्रांत अध्यक्ष अशोक औटी, बहुउद्देशिय संस्थेचे सदस्य मुरलीधर मगर उपस्थित होते.

     रमेश बिडवे व वनिता बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली तांड्यावरील मुला-मुलींना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी कुटूंबातील सदस्यांना आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करुन भटक्या-विमुक्त समाजाला महामंडळाच्या माध्यमातून मदत करण्याचे आश्वासन श्री.भुजबळ यांनी यावेळी दिले.

      महिला जिल्हाध्यक्षा वनिता बिडवे, बापुसाहेब औटी , अनिल निकम, अशोक औटी, श्रीपाद वाघमारे, मुरलीधर मगर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पवळे यांनी केले तर भटके-विमुक्त जाती - जमातीचे राज्य उपाध्यक्ष उत्तम सावंत यांनी सर्वांचे आभार मानले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या