Ticker

6/Breaking/ticker-posts

नगरमध्ये लसीकरण ठप्प, नागरिकांनी केलं आंदोलन

  लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर :महाराष्ट्रात लसीकरणासंबंधी विक्रम रचल्याचे दावे केले जात असले तरी अहमदनगर शहरात मात्र, लसीकरण अतिशय संथ गतीनं सुरूय.अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत केवळ सात टक्के नागरिकांचं लसीकरण झालंय.

 

या आठवड्यात सलग तीन दिवस लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळं लसीकरण बंद राहिले. खासगी रुग्णालयांनी यासाठी पैसेही भरले आहेत, मात्र, त्यांना लस देण्यात आलेली नाही.याला वैतागून नगरमधील जागरूक नागरिक मंचातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या