Ticker

6/Breaking/ticker-posts

धवननं सर केले अनेक विक्रमांचे ‘शिखर’ ; श्रीलंकेविरुद्ध ऐतिहासीक कामगिरी

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

भारत आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय सामन्यांच्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतानं सात विकेट्सनं विजय मिळवला. या विजयासह कर्णधार शिखर धवननं अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.

तीन एकदिवसीय सामन्यांच्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतानं सात विकेट्सनं विजय मिळवला. या विजयासह भारतीय कर्णधार शिखर धवननं अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. धवननं या सामन्यात पहिल्यांदा कर्णधारपद सांभाळलं आणि नाबाद 86 धावा करत काही विक्रमही आपल्या नावे केले. त्यानं माजी कर्णधार सौरव गांगुलीचा एक विक्रम मोडीत काढला.  

धवनच्या सहा हजार धावा पूर्ण

धवनने  86 धावांची खेळी करता सहा चौकार आणि एक षटकार लगावला. या बरोबरच धवनने वन डे क्रिकेटमध्ये 6000 धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला. धवनने 6000 धावाचा टप्पा गाठताना धवनने वेस्ट इंडिजचे सर विवियन रिचर्ड आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट यांना मागे टाकले आहे.तो 6 हजार धावा करणारा 13 वा भारतीय खेळाडू बनला. या यादीत भारताच्या सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, विरेंद्र सहवाग, गौतम गंभीर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, युवराज सिंह, सुरेश रैना आणि मोहम्मद अझहरुद्दीन या नावांचा समावेश आहे. 

सर्वात वेगवान 6 हजार धावा 
शिखर धवननं 140 इनिंग्समध्ये 6 हजार धावा केल्या. त्यानं  सौरव गांगुलीचं रेकॉर्ड मोडीत काढलं. गांगुलीनं 147 इनिंग्समध्ये   6000 धावा केल्या होत्या. तर विराट कोहलीने 136 इनिंग्समध्ये  6000 धावा केल्या होत्या. विराटनंतर सर्वात वेगवान 6000 धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज शिखर धवन आहे. सर्वात जलद सहा हजार धावा पूर्ण करण्याचे रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाच्या नावावर आहे. आमलाने फक्त 123 सामन्यातच हा विक्रम केला आहे. आमलानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारताचा कर्णधाप विराट कोहलीचा (136 सामने) क्रमांक लागतो. आणि तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (139 सामने) आहे.

सर्वात वयस्कर कर्णधार
शिखर धवननं श्रीलंकेविरुद्ध कर्णधारपद सांभाळलं. तो सर्वात वयस्कर भारतीय कर्णधार ठरला आहे.  धवन वय आता 35 वर्ष 225 दिवस इतकं आहे. याआधी मोहिंदर अमरनाथ 34 वर्ष 37 दिवस वय असताना कर्णधार बनले होते. शिखरनं 37 वर्ष जुनं रेकॉर्ड मोडलं आहे.  

भारताने श्रीलंकेवर मिळवला  ७ विकेट्सने विजय

श्रीलंकेवर भारताने श्रीलंकेवर सात विकेट्सने विजय मिळवला आहे. श्रीलंकेने भारतासमोर  262  धावांचे आव्हान समोर ठेवले होते.  हे आव्हान भारताने 36. 4  षटकात 3 विकेट गमावून पूर्ण केले.  भारताचा कर्णधार शिखर धवनने 95 चेंडूमध्ये नाबाद 86 धावांची खेळी करत संघाचा विजय सोपा केला. इशान किशन 59 आणि पृथ्वी शॉ ने 43 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने नाबाद 31 धावा केल्या. भारताने हा सामना जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे.   

त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेनं 50 षटकात 262 धावा केल्या. पृथ्वी शॉ (43 रन, 24  बॉल, 9 चौकार), शिखर धवन (नाबाद 86 रन, 95 बॉल, 6 चौकार, 1 षटकार),  ईशान किशन (59 रन, 42 बॉल, 8 चौकार, 2 षटकार), मनीष पांडे (25 रन, 40 बॉल, 1 चौकार, 1 षटकार) आणि सूर्यकुमार यादव (नाबाद 31 रन, 20 बॉल, 5 चौकार) जोरावर हे आव्हान भारताने 36. 4  षटकात 3 विकेट गमावून पूर्ण केले. श्रीलंकेकडून धनंजय सिल्वाने दोन गडी बाद केले. तर भारताकडून दीपक चहर, कुलदीप यादव आणि चहल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. दुसरी वन डे 20 जुलैला खेळवण्यात येणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या