Ticker

6/Breaking/ticker-posts

थकबाकीने महावितरणालाच आता शॉक; आर्थिक स्थिती डबघाईला

 

*पश्चिम महाराष्ट्रात सध्या वीजपुरवठा सुरु असलेल्या लघुदाबाच्या (कृषी वगळून) २४ लाखावर ग्राहकांकडे तब्बल २ हजार ६८५ कोटी रुपयांची थकबाकी.

*थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती वीजबिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे सध्या गंभीर आहे.








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क) 

कोल्हापूर : वीजबिलांच्या दरमहा वसुलीवरच संपूर्ण आर्थिक मदार असलेल्या महावितरणची आर्थिक स्थिती वाढत्या थकबाकीमुळे डबघाईस आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात सध्या वीजपुरवठा सुरु असलेल्या लघुदाबाच्या (कृषी वगळून) २४ लाखावर ग्राहकांकडे तब्बल २ हजार ६८५ कोटी रुपयांची थकबाकीआहे. थकबाकीचा हा शॉक मोठा असल्याने सध्या वीजखरेदीसह दैनंदिन देखभाल व इतर खर्चासाठी आर्थिक कसरत सुरु आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कृषी ग्राहक वगळता इतर सर्व ४ लाख ११ हजार ६४४ ग्राहकांकडे सद्यस्थितीत ३३७ कोटी ४६ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. यामध्ये प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ४ लाख १ हजार ३०३ ग्राहकांकडे १८० कोटी ५१ लाख रुपयांची थकबाकी आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांच्या ५००९ वीजजोडण्यांचे १५२ कोटी २६ लाख रुपयांची थकबाकी आहे. वारंवार आवाहन करून देखील थकबाकीचा भरणा होत नसल्याने थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या कटू कारवाईला महावितरणने सुरुवात केली आहे. सर्व वरिष्ठ अधिकारी देखील या मोहीमेत सहभागी झाले आहे.

दरम्यान १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या अनुदानातून पथदिवे व पाणीपुरवठा योजनांचे वीजबिल संबंधीत ग्रामपंचायतींद्वारे अदा करण्याचे राज्य सरकारने नुकतेच आदेश दिला आहे. त्याप्रमाणे ग्रामपंचायतींकडून सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु काही ग्रामपंचायतींनी वीजबिलांच्या थकबाकीमुळे महावितरणच्या वीजयंत्रणेवर कर लावण्याचा इशारा दिला आहे. मात्र या कराचा भुर्दंड सर्वसामान्य वीजग्राहकांवर वीजदराच्या स्वरुपात पडणार असल्याने ग्रामपंचायती, नगरपालिका व महानगरपालिकांनी शासकीय कंपनीच्या वीजयंत्रणेवर कोणत्याही कराची आकारणी करू नये असा आदेश २०१८ मध्ये राज्य शासनाने दिला आहे.

थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती वीजबिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे सध्या गंभीर आहे. या अत्यंत कठीण अवस्थेत महावितरणचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी वीजग्राहकांनी चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून आले आहे. थकीत वीजबिलांचा भरणा सोयीचा व्हावा यासाठी शनिवारी (दि. १७) व रविवारी (दि. १८) या सार्वजनिक सुटीच्या दिवशी महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या