Ticker

6/Breaking/ticker-posts

महिला उपविभागीय अधिकारी लाच घेताना रंगेहात पकडली !

 *वाळू ठेकेदाराकडून लाच घेताना लाचुचपत प्रतिबंधक पथकाची कारवाई

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

भूम (जि. उस्मानाबाद):  वाळू ठेकेदाराला वाळू उपसा करण्याची परवानगी देण्यासाठी लाच घेताना भूम (जि. उस्मानाबाद) येथील उपविभागीय अधिकारी मनीषा राशीनकर यांना उस्मानाबाद लाचुचपत प्रतिबंधक पथकाने मंगळवारी सायंकाळी पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील तक्रारदार ठेकेदाराने वाळू उपसा करण्यासाठी उपविभागीय कार्यालयात मागणी प्रस्ताव सादर केला होता. मात्र त्याला परवानगी देण्यासाठी उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर यांनी मध्यस्थामार्फत एक लाख वीस हजार रुपयांची लाच मागितली होती.

यादरम्यान ठेकेदाराने उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार भूम येथे सापळा रचून लाच घेताना उपविभागीय अधिकारी मनीषा राशीनकर यांना ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या