Ticker

6/Breaking/ticker-posts

लिअँडरबद्दल बोलताना महिमा चौधरी म्हणाली- 'खेळाडू म्हणून तो ग्रेट असेल, माणूस म्हणून नाही'

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई : सध्या भारतीय टेनिसपटू लिअँडर पेस आणि अभिनेत्री किम शर्मा एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांचे गोव्यातील रोमँटिक मूडमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे या दोघांची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर लिअँडर पेसची एक्स गर्लफ्रेंड असलेल्या महिमा चौधरी हिने तो खेळाडू म्हणून ग्रेट असेल पण माणूस म्हणून विश्वासू नाही, अशी टीका केली आहे.

लिअँडर माणूस म्हणून विश्वासू नाही

१९९७ मध्ये रिलीज झालेल्या 'परदेस' सिनेमापासून महिमाने बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात केली. या सिनेमामुळे तिला लोकप्रियताही मिळाली. त्या काळात महिमा आणि टेनिसपटू लिअँडर पेससोबत रिलेशनमध्ये होते. परंतु त्यांचे हे नातं फार काळ टिकलं नाही. महिमा चौधरीने एका मुलाखतीमध्ये लिअँडर पेस सोबत नात्यामध्ये असतानाचे अनुभव सांगितले. तो टेनिसपटू म्हणून भले उत्तम असेल, परंतु माणूस म्हणून माझा त्याच्याबद्दलचा अनुभव चांगला नाही, या शब्दांत तिने खंत व्यक्त केली आहे. महिमाने या मुलाखतीमध्ये सांगितले, ' मी आणि लिअँडर एकमेकांना डेट करत होतो. तेव्हादेखील त्याचे रिया पिल्लईसोबत अफेअर सुरू होते. त्यांच्यात दिवसाणिक जवळीक निर्माण होत असल्याने आमच्या नात्यामध्ये तणाव निर्माण झाला आणि आम्ही वेगळे झालो.'
महिमाने तिच्या मुलाखतीमध्ये पुढे सांगितले, 'अर्थात त्याच्या अशा वागण्याचे मला आश्चर्य वाटले नाही. मला जेव्हा कळले तो दुसऱ्या मुलीसोबत फिरत आहे. याबद्दल त्याला मी विचारले देखील. परंतु त्याने कधीच समानधानकारक उत्तरं दिली नाहीत. अखेर तो माझ्या आयुष्यातून निघून गेला. अर्थात त्याच्या जाण्याने माझ्या आयुष्यावर फार काही परिणाम झाला नाही. परंतु या अनुभवावरून मी खूप काही शिकले. मी जीवनाकडे अधिक प्रगल्भपणे पाहू लागले. मला असे वाटते की त्यानंतर त्याने रियाचीही फसवणूक केली.'

महिमाने २००६ मध्ये आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीशी लग्न केले. त्यानंतर काही महिन्यांनी तिने मुलीला अरियानाला जन्म दिला. पण महिमा आणि बॉबी यांचे लग्न फार काळ टिकले नाहे. हे दोघेजण २०१३ पासून वेगळे राहू लागले. परंतु त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही. परंतु मुलीला सांभाळायची जबाबदारी महिमाने घेतली.

सध्या टेनिसपटू लिअँडर पेस आणि अभिनेत्री किम शर्मा एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांचे गोव्यामधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या दोघांच्या नात्यावर चर्चा सुरू झाली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या