Ticker

6/Breaking/ticker-posts

राष्ट्रवादीचं ‘मिशन यूपी ‘शरद पवार लालूंच्या भेटीला

 *आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढविण्याची  घोषणा

*लालू प्रसाद यादव जामिनावर तुरुंगातून बाहेरलोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका लढण्याची घोषणा करण्यात आली होती. उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेसनं समाजवादी पक्षासोबत हातमिळवणी केलीय. यानंतर, बुधवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार  यांनी दिल्लीत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची भेट घेतलीय.


आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात जोरदार खलबतं सुरू आहेत. चारा घोटाळ्यात शिक्षा भोगत असलेले परंतु, सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर पडलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव हेदेखील पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय होताना दिसत आहेत.

लालू प्रसाद यादव सध्या दिल्लीत आहेत. यूपी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठींचा कार्यक्रम लालूंकडून सुरू झालाय. याच दरम्यान, लालू प्रसाद यादव आणि माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही नुकतीच भेट झालीय.

लालूंचा मुक्काम दिल्लीत सध्या आपली मुलगी - राज्यसभा खासदार मीसा भारती  यांच्या घरी आहे. इथेच, शरद पवार यांनी लालूंची भेट घेतली. ' राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. दीर्घकाळानंतर जुने सहकारी लालूजी यांना भेटून आनंद झाला' असं ट्विट शरद पवार यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून करण्यात आलंय. शरद पवार यांच्यासोबत समाजवादी पक्षाचे रामगोपाळ यादव , काँग्रेस खासदार अखिलेश प्रताप सिंह यांनीही लालूंची भेट घेतलीत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये  - राष्ट्रवादी काँग्रेसकडून समाजवादी पक्षासोबत हातमिळवणी करत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे महासचिव के के शर्मा आणि प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यांनी मंगळवारी लखनऊत एका पत्रकार परिषदेत केली होती.

याच दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या दिल्ली दौऱ्यात भारतीय जनता पक्षाविरोधात विरोधकांचा संयुक्त मोर्चा उघडण्याच्या चर्चा सुरू आहेत.

राजकारणात सक्रीय होणार : लालू

आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक तसंच लोकसभा निवडणूक २०२४ च्यादृष्टीने लालूंनी तयारी सुरू केल्याचं दिसून येतंय. ५ जुलै रोजी पक्षाच्या २५ व्या स्थापना दिनानिमित्त झालेल्या एका कार्यक्रमात लालूंनी आपण पुन्हा एकदा बिहारच्या राजकारणात सक्रीय होणार असल्याची घोषणा केली होती.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या