लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर:
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील भेटीचे आपल्याला काहीच
आश्चर्य वाटत नाही. पूर्वी सर्वपक्षीय नेते असे भेटत असत. अशा भेटींची राजकीय
चर्चा करण्याची प्रथा भाजपनेच सुरू केली,’ असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
महसूल
मंत्री थोरात यांनी शिर्डी येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी
भाजपसह अन्य पक्षातील काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर
प्रसार माध्यमांशी थोरात यांनी संवाद साधला. थोरात म्हणाले, ‘पवार- मोदी भेटीत मला काहीच आश्चर्यकारक वाटत नाही. लोकशाहीत मतमतांतरे
असतात. मात्र कामानिमित्त एकमेकांना भेटावे लागते. पूर्वीच्या काळी सर्व पक्षाचे
लोक एकत्र भेटत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील लोक एकत्र येत जेवणही करीत.
काळाच्या ओघात भाजप पुढे आला आणि त्यांनी वेगळे राजकारण सुरू केले. त्यामुळे आता
अशा भेटींचे आश्चर्य वाटू लागले आहे.'
राज्याच्या
दृष्टीने अनेक विषय केंद्र सरकारशी निगडीत आहेत. त्यासाठी पवार यांनी मोदींची भेट
घेतली, असे मला वाटते. मराठा आरक्षण,
ओबीसी आरक्षण, लसीकरण, कृषी
कायदे, नव्याने स्थापन झालेले सहकार मंत्रालय, सहकारी बँकांवरील निर्बंध, त्याचा सहकारावर होणारा
परिणाम, जीएसटीचा परतावा यासंबंधी चर्चा करण्यासाठी पवार
यांनी मोदींची भेट घेतली असेल. केंद्र सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी राज्याची
जबाबदारी त्यांच्यावर असतेच. त्यानंतर संजय राऊत पवारांना भेटले, यातही मला काहीच आश्चर्य वाटत नाही. राऊत खासदार आहेत, तेही दिल्लीत असल्याने पवार यांना भेटले असतील, असेही
थोरात म्हणाले.
नाशिकमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
यांनी इडीच्या कारवाईसंबंधी केलेल्या वक्त्यावर थोरात म्हणाले, ‘काँग्रेसच्या काळात ईडी कोणाला
माहितीही नव्हती. आता ईडीचे एवढे राजकीयकरण झाले आहे की, ते
लहन मुलांनाही माहिती झाले आहे. चंद्रकांत पाटील म्हणत असतील रात्रीतून कोणाही अटक
होऊ शकते याचा अर्थ हाच आहे की भाजपकडून पक्षाच्या मदतीसाठी आणि विरेधकांवर दहशत
निर्माण करण्यासाठी या संस्थांचा वापर केला जात आहे, हे
त्यांच्या बोलण्यातूनच दिसून येते,’ असेही थोरात म्हणाले.
शिर्डी
संस्थानच्या विश्वस्त मंडळ नियुक्तीसंबंधी थोरात म्हणाले, ‘पूर्वी साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद
काँग्रेसकडे असले तरी आता बदलून दुसरे मिळेल. त्यामुळे यासंबंधी आमचा अग्रह नाही.
आम्हाला कोठेही काम करायचे आहे. नवे विश्वस्त मंडळ लवकरच जाहीर होईल. आता त्यात
काहीही अडचण नाही,’ असेही थोरात यांनी सांगितले.
0 टिप्पण्या