Ticker

6/Breaking/ticker-posts

सक्तीच्या वीजबिल वसूली विरोधात शेवगावला सर्वपक्षीय रास्तारोको

लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )


     शेवगाव: वीजबिल वसुलीच्या विरोधात शहरातील गाडगे बाबा  चौकात विज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर सर्व पक्षीय पदाधिका-यांनी रस्त्यावर टायर जाळत व जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

शेवगाव शहरासह तालुक्यातील महावितरणकडून वीजबिल वसुलीसाठी  वीज कनेक्शन सक्तीने तोडण्यात येत आहेत. कोरोना काळत नागरिकांचा रोजगार बुडाला असुन नागरिकांचा रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झालेला असताना अनेक ठिकाणी चुकिचे रिडीग दुरूस्त न करता वीज बीले दिली जात आहेत तर अनेक ठिकाणी नागरिकांना वीज बीले देखील दिली जात नाहित. अनेक ठिकाणी कंपनीचे कर्मचारी अरेराविची भाषा वापरत आहेत तसेच चालू थकबाकी असणा-या ग्राहकांचे देखील वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरु केलेली आहे.

 याबाबत कुठल्याहि स्वरूपात न कळविता वीज कनेक्शन तोडली जात आहेत हि मोहिम तातडिने थांबवावी अशा विविध मागण्या घेऊन भाजपाचे सुनिल रासने,मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, गणेश डोमकावळे, टपरी धारक संघटनेचे कमलेश लांडगे, समीर शेख भाकपाचे संजय नांगरे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशात भराट,दत्तात्रय फुंदे,भाऊ बैरागी,नगरसेवक उमर शेख आदि प्रमुख पदाधिकारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात गेले होते याठिकाणी अधिका-यांनी प्रतिसाद न दिल्याने या पदाधिका-यांनी शेवगाव नगर रस्त्यावर टायर पेटवून देत रास्ता रोको आंदोलन सुरु केले व जोरदार घोषणाबाजी केली. 

यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी रांगा लागल्या होत्या. सुमारे एक तास वाहतुक ठप्प झाली होती. यावेली देविदास हुशार, ज्ञानेश्वर कुसळकर,विठ्ठल दुधाळ, सुनिल काथवटे, सचिन काथवटे, बाळासाहेब फंटागरे,निवृत्ती आधाट,अशोक भोसले,कैलास शिंदे  यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.या ठिकाणी दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. महावितरणचे अंभियंता लोहारे यांना निवेदन देण्यात आले.

वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांची सक्‍तीची वीज बील वसुली थांबवावी, लॉकडाउनच्या काळातील संपूर्ण वीज बिल माफ करावे, खंडित केलेला वीज पुरवठा तत्काळ पूर्ववत करावा, ९० टक्‍के वीज बिलात रीडिंग घोटाळा आहे. तो दुरुस्त करावा,  या प्रकरणी योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या