Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगाव नगर परिषदेवर नविन प्रशासकाची नियुक्त्ति करावी- मनसेने अध्यक्ष रांधवणे

लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

शेवगाव - नगर परिषदेवरील प्रशासक हटवून नविन प्रशासकाची नियुक्त्ति करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी केली असून या संदर्भात लवकरच जिल्हाअधिका-याची भेट घेऊन शेवगावकराच्या तक्रारीचा लेखा जोखा पुराव्यानिशी ते जिल्हाधिका-यांना मनसेचे व शहरातील नागरिकांचे शिष्टमंडळ सादर करणार आहेत. 

शेवगाव नगरपरिषदेची मुदत संपल्याने शेवगाव नगरपरिषदेवर उपविभागीय अधिका-यांची प्रशासक म्हणुन नियुक्त्ति करण्यात आलेली आहे. यातच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कल यांची बदली झाल्याने याठिकाणी प्रभारीराज आहे. यामुले शेवगाव नगरपरिषद हद्दीतील नागरिकाचे मुलभूत गरजेचे प्रश्न निर्माण झालेला आहे. गेल्या आठ दिवसापासून वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडीत केल्याने संपूर्ण शहर अंधारात असल्याने चो-यांचे प्रमाण वाढलेले आहे. यातच नगरपरिषदेला स्ट्रिट लाईट व एल ई डी पुरवठा व दुरूस्ती कामाचा करारनामा संपल्याने अनेक भागात गेल्या आठ महिन्यापासून दिवा बत्ती विभागाचे काम पूर्ण पणे ठप्प झालेले आहे. घनकचरा संकलन करणारे वाहने देखील वेळेवर कचरा संकलन करत नसल्याने शहरात कच-याचे ढिग जमा झाल्याने डासाचा प्रादुर्भाव झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
 शहरातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला असून सध्या शहरातील विविध भागात दहा ते बारा दिवसानी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असून पावसाळयापूर्वीची नालेसफाई व कामे न झाल्याने पहिल्याच पावसात अनेक भागात पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले होते. गेल्या कित्येक महिन्यापासून नगरपरिषद कर्मचा-याचे पगार रखडलेले असून त्याच्यांवर उपासमारिची वेळ आलेली आहे.

सर्व मुलभूत प्रश्न सोडविण्यास नगरपरिषद प्रशासन अपयशी ठरले असल्याने जिल्हाधिका-यांनी  तातडीने यात लक्ष देऊन शेवगाव नगरपरिषदेला   नविन पूर्णवेळ प्रशासक द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे केली असून या संदर्भात लवकरच नागरिकांसह  जिल्हाअधिका-याची भेट  घेण्याकरिता वेळ मागितलेला असून याबाबत तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल असे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या