Ticker

6/Breaking/ticker-posts

Yoga Day 2021 : योगाभ्यासात लोक करतात भयंकर चूका ! योग कधी व कसा करावा ?

 







लोकनेता न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 नवी दिल्ली : जग खूप पुढे गेलं आहे आणि अजून नवनवीन प्रगती करत आहे. पण अजून एकही असे साधन वा उपकरण तयार झालेले नाही जे तुम्हाला स्वत:हून निरोगी राखेल. तुमच्या स्वत:च्या आरोग्याची काळजी तुम्हालाच घ्यावी लागते. आपल्या आहारा पासून व्यायामा पर्यंत सर्व गोष्टी प्रामाणिकपणे स्वत:च कराव्या लागतात. मात्र अशावेळी योग्य मार्गदर्शनाची देखील गरज भासते. जर योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर अनेक चुका होऊ शकतात आणि त्या चुकांचा पुन्हा विपरीत परिणाम शरीरावर होऊ लागतो. योग (yoga) हा अत्यंत लोकप्रिय व्यायाम प्रकार होत आहे आणि अनेक जण न चुकता योग करत आहेत.

 

पण तुम्हाला माहित आहे का फक्त योग्य पद्धतीने करून चालत नाही, तुम्हाला त्या सोबत आहार काय काय घ्यावा आणि कसा व कधी घ्यावा हे देखील माहित असणे गरजेचे आहे. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन (international yoga day 2021) आहे आणि त्या दिनाच्या निमित्तानेच आज आम्ही या लेखातून तुम्हाला एक आगळी वेगळी माहिती सागणार आहोत. ती माहिती म्हणजे योग करण्याआधी आणि केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये?

 

योग कधी करावा?

योग करण्याची वेळ लोक आपापल्या पद्धतीने ठरवतात पण जर तुम्ही विचारलं की अगदी योग्य वेळ कोणती? तर त्याचे उत्तर आहे रोज सकाळी उपाशी पोटी योग करणे सर्वोत्तम होय. या काळात तुम्ही काही खाल्लेले नसते आणि त्यामुळे पूर्ण फोकस योग करण्यावर असतो. पण लक्षात ठेवा उठल्यावर 30 मिनिटांच्या आत योग सुरु करावा. जर तुम्हाला सकाळी अजिबातच शक्य नसेल तर संध्याकाळी योग करावा. मात्र वेळ अशी निवडावी की रात्रीचे जेवण करणाऱ्यासाठी 60 ते 90 मिनिटे बाकी असतील आणि योग करण्याआधी 2 ते 3 तास तुम्ही काहीही खाल्लेलं नसावं.

 

45 मिनीटांआधी काहीतरी खावे

जर तुम्ही सकाळच्या वेळी योग करत असाल आणि तुम्हाला सकाळी उठून जवळपास 1 ते 2 तास झाले असतील तर नक्कीच योग करण्याच्या 45 मिनिटे आधी तुम्ही काहीतरी खाल. हे यासाठी जेणेकरून जर तुम्हाला उठून खूप वेळ झाला आहे तर तुमच्या शरीरातील उर्जा कमी झालेली असते. अशा स्थितीत योग वर लक्ष केंद्रित होणार नाही. म्हणून उठल्या उठल्या योग करावे. शक्य असल्यास 45 मिनिटे आधी फ्रुट ज्यूस प्यावा किंवा काहीतरी फळे खावीत.

योग नंतर काय खावे?

योग केल्यानंतर भूक लागणे साहजिकच आहे. अशावेळी अनेक जण चूक करतात आणि जे मिळेल ते तळलेले, भाजलेले पदार्थ खातात. त्यात अनेकदा मसालेदार आणि गोड पदार्थ सुद्धा असतात. पण असे केल्याने योग करून शरीराला जो तुम्ही फायदा मिळवून दिला आहे तो तुम्ही या खाण्याने वाया घालवता. जर तुम्ही सकाळी योग करत असाल तर हाय प्रोटीन आणि व्हिटॅमिन मिनरल्स युक्त पदार्थांचेच सेवन करा. यात तुम्ही सुका मेवा, फळे, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराला केवळ उर्जाच मिळणार नाही तर शरीर निरोगी देखील राहील. लक्षात ठेवा की योग करून झाल्यावर 30 मिनिटे किंवा 45 मिनिटे नंतरच काहीतरी खावे.

 

जड आहारानंतर लगेच योग करू नये

जर तुम्ही सकाळ ऐवजी संध्याकाळी योग करत असाल तर काही गोष्टींची काळजी तुम्ही घेतली पाहिजे, जर तुम्ही लंच मध्ये किंवा संध्याकाळच्या वेळेस खूप जास्त काही खाल्ले असेल तर कमीत कमी 4 तास तरी योग करू नका. जर तुम्ही हलका आहार घेतला असेल तर तुम्ही 2 तासांनी योग करू शकता. जर तुम्ही काहीच खाल्ले नसेल आणि तुम्हाला अशक्त वाटत असेल तर फ्रुट ज्यूस किंवा फळे खा आणि 45 मिनिटांनी योग करायला सुरुवात करा.

 

रात्री हे पदार्थ खाऊ नका

जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस योग करत असाल तर या गोष्टींची काळजी घ्या की रात्रीचे जेवण अगदी पोट फुटेपर्यंत करू नका. सोबत अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की आहारात मसालेदार आणि गोड पदार्थांचे सेवन करू नका. या काळात कोणतेही कोल्ड ड्रिंक वा सोडा ड्रिंक देखील घेऊ नका. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी खूप प्या. भले तुम्ही योग करत असाल वा नसाल तरी दिवसभर खूप पाणी पिण्याची सवय लावा. हे पाणी जास्त गरम व जास्त थंड असू नये. सामान्य तापमानातले पाणी तुम्हाला जास्त निरोगी राखेल.

 

योग करताना पाण्याचे महत्व

प्रत्येक व्यक्तीसाठी तो योग करत असो किंवा नाही, पण या दोन्ही बाबतीत पहिली गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त पाणी पिण्याची सवय लावून घ्या. कधीही थंड पाणी पिऊ नका. हे लक्षात ठेवा की जर आपण थंड पाणी पित असाल तर शरीरास ते गरम करण्यासाठी आणि शरीराच्या तापमानाशी जुळवून घेण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते. म्हणूनच, फक्त सामान्य तापमान असलेलेच पाणी प्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या