Ticker

6/Breaking/ticker-posts

गटविकास अधिकाऱ्यावर बूट भिरकावला ; दबंग नेते बाळासाहेब नाहाटांना अटक . .?.

 लोकनेता न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

श्रीगोंदा : -नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पंचायत समितीतील गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बाळासाहेब नाहाटा यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे .


श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकणाथ ग्रामपंचायत च्या माध्यमातून १४ व्या वित्त आयोगातून अनेक कामे विनापरवाना केले असल्याची तक्रार गावातील नागरिकाने केली होती. याबाबत गटविकास अधिकारी चौकशी अहवाल सादर करत असल्याची माहिती बाळासाहेब नाहटा यांना मिळाली.


नाहटा यांनी गटविकास अधिकारी यांच्याशी किरकोळ बाचाबाची केली तरीही गटविकास अधिकारी हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने नाहटा यांचा राग अनावर झाला आणि बाहेर निघालेल्या गटविकास अधिकारी यांच्या दिशेने नाहटा यांनी पायातील बूट फिरकवला. नाहाटा हे दबंग नेते म्हणून तालुक्यात ओळखले जातात . गट विकास अधिकाऱ्यांना त्यांच्या दबंगगिरीची सलामी मिळाल्याची लोणी परिसरात जोरदार चर्चा झडत आहे .


लोणी व्यंकणाथ ग्रामपंचायत च्या माध्यमातून 14 व्या वित्त आयोगाच्या निधीमधील रक्कम कोणत्याही कामाची परवानगी न घेता अनेकदा वापरली मात्र याबाबत एका नागरिकाने याबाबत गटविकास अधिकारी श्रीगोंदा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या अर्जावर कारवाई करत गटविकास अधिकारी यांनी तत्कालीन सरपंच यांच्यावर अपात्रतेची कारवाई करत असतांना त्यांच्यात शब्दीक खडाजंगी झाली. समजून सांगूनही गटविकास अधिकारी ऐकत नाहीत , त्यांच्याच मुद्यांवर ठाम राहिले . त्यामुळे मुद्यांची गोष्ट गुद्यांवर आली . राग अनावर झाल्या नाहाटांनी कार्यालयाबाहेर पडलेल्या गट विकास अधिकाऱ्यांवर पायातील बूट भिरकावला .  या निमित्ताने गांव पातळीवरील अधिकारी -पदाधिकारी यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे . या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी नाहाटा यांना अटक केल्याची माहिती विश्वसनिय सूत्राकडून मिळाली .

करण्यासाठी अहवाल तयार करून जिल्हा परिषद कार्यालयात कारवाई करण्यासाठी दाखल करणार असल्याची माहिती बाळासाहेब नाहटा यांना मिळाली होती. नाहटा यांनी पंचायत समिती मधील गटविकास अधिकारी यांचे कार्यालय गाठले त्यांनी गटविकास अधिकारी यांच्याशी संबंधित विषयवार चर्चा करत असताना त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. अनेकदा समजून सांगूनही गटविकास अधिकारी ऐकत नसल्याने नाहटा यांचा राग अनावर झाला त्यांनी पायातील बूट गटविकास अधिकारी यांच्यावर फेकला.
करण्यासाठी अहवाल तयार करून जिल्हा परिषद कार्यालयात कारवाई करण्यासाठी दाखल करणार असल्याची माहिती बाळासाहेब नाहटा यांना मिळाली होती. नाहटा यांनी पंचायत समिती मधील गटविकास अधिकारी यांचे कार्यालय गाठले त्यांनी गटविकास अधिकारी यांच्याशी संबंधित विषयवार चर्चा करतअसताना त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. अनेकदा समजून सांगूनही गटविकास अधिकारी ऐकत नसल्याने नाहटा यांचा राग अनावर झाला त्यांनी पायातील बूट गटविकास अधिकारी यांच्यावर फेकला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या