Ticker

6/Breaking/ticker-posts

' आकडेवारी लपवली त्या राज्यांत मृतदेह गंगाकिनारी साचले'- ना. थोरात

 

*ज्यांनी आकडेवारी लपवली तिथे मृतदेह गंगाकिनारी साचले.

*बाळासाहेब थोरात यांचा भाजपशासित राज्यांवर निशाणा.

 


लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 संगमनेर : ‘ करोना संकटात महाविकास आघाडी सरकारने अत्यंत प्रभावी व पारदर्शक काम करताना सत्य आकडेवारी सांगितली आहे. याउलट ज्यांनी आकडेवारी लपवली, त्या राज्यांत मृतदेह गंगेच्या कडेला साचले होते,’ अशी टीका महसूलमंत्री व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.


सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा नवीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आज कार्यान्वित करण्यात आला. यावेळी थोरात बोलत होते.
थोरात म्हणाले, ‘करोनाच्या संकटात महाविकास आघाडी सरकारने अत्यंत प्रभावी उपाययोजना करत काम केले आहे. या कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. करोना संसर्गाचे संकट अद्याप संपलेले नाही. कोणीही हलगर्जीपणा करू नका. करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. टास्क फोर्सच्या मते तिसरी लाट येण्याचा मोठा धोका आहे. यामध्ये राज्यात ५० लाख रुग्ण असू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. दुसऱ्या लाटेमध्ये निर्माण झालेल्या ऑक्सिजनचा तुटवड्यामुळे राज्य सरकारने तीन हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये राज्यातील २३ सहकारी साखर कारखान्यांनी सहभाग घेतला आहे. साखर कारखान्यांमधून थोरात कारखाना हा तिसरा ऑक्सिजन निर्मिती करणारा कारखाना ठरला आहे. कारखान्याने कायम तालुक्याचे हृदय म्हणून काम केले असून मागील लाटेमध्ये ५०० बेडचे

कोविड सेंटर सुरू करताना सर्व सहकारी संस्थांनी अत्यंत मदतीची भावनेतून काम केले.

या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून दररोज ८५० किलो ऑक्सिजन निर्माण होणार आहे. तो शंभर रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागवणार आहे. याच बरोबर आज निळवंडे धरणाच्या जवळील पहिल्या बोगद्याचे ब्लास्टिंग करून हा बोगदा खुला करण्यात आला. हा एक सुवर्णयोग आहे. निळवंडेच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या कामाला गती दिली असून २०२२ च्या पावसाळ्यात या दोन्ही कालव्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवण्यासाठी काम सुरू आहे,' असे थोरात म्हणाले. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या