Ticker

6/Breaking/ticker-posts

सोनं खरेदीची 'सुवर्ण'संधी ! ; आठवडाभरात झालं दोन हजारांनी स्वस्त..

 


लोकनेता न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

मुंबई : जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत आणि भांडवली बाजारातील तेजी यांनी सोने आणि चांदीमधील तेजीला हादरून सोडलं आहे. मल्टी कमोडीटी एक्सचेंजमध्ये आठवडाभरात सोनं दोन हजारांनी स्वस्त झाले आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव ४८६०० रुपयांच्या आसपास होता. शुक्रवारी तो ४६६०० रुपयांवर स्थिरावला.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स) शुक्रवारी सोन्याचा भाव ४६६६० रुपयांपर्यंत खाली आला होत. त्यानंतर तो ४६८०० रुपयांवर स्थिरावला. त्यात १५८ रुपयांची घसरण झाली. एक किलो चांदीचा भाव ६७५८० रुपये असून त्यात १९ रुपयांची किरकोळ घसरण झाली.


Goodreturns  या वेबसाईटनुसार आज शनिवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७७३५ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेटचा भाव ४८३५० रुपये आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६३९० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०४८० रुपये झाला आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४५४० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८५९० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६६१० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९३९० रुपये आहे.


जागतिक कमॉडिटी बाजारात शुक्रवारी सोन्याने नऊ महिन्यातील नीचांकी स्तर गाठला. सोन्याचा भाव १७७०.६० डॉलर इतका खाली आला आहे. आठवडाभरात सोन्याच्या किमतीत ४.५ टक्के घसरण झाली आहे. त्याशिवाय चांदीमध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. चांदीचा भाव आठवडाभरात ६.९ टक्क्यांनी कमी झाला आहे. चांदीचा भाव २५.९३ डॉलर प्रती औंस आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या