Ticker

6/Breaking/ticker-posts

राम मंदिरासाठीच हा निधी खर्च होतोय ना?; राष्ट्रवादीने केली 'ही' मागणी

 पारदर्शीपणासाठी अराजकीय समिती तयार करा. राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

मुंबई: अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी गोळा होणारा पैसा पारदर्शीपणाने खर्च होतोय की नाही, हे बघण्यासाठी देशातील रामभक्तांनी अराजकीय अशी एक समिती तयार करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.राम मंदिर उभारणीसाठी जमा झालेल्या निधीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आणि सेना  भाजप यांच्यात बुधवारी झालेली हाणामारी यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता जयंत पाटील यांनी अराजकीय समितीची मागणी पुढे केली. ही समिती राम मंदिर उभारणीतील जमाखर्च आणि त्याचा हिशोब ठेवण्याचे काम करेल. त्रयस्थ समितीच्या निरीक्षणाखाली सर्व गोष्टी झाल्यास आक्षेप घेतला जाणार नाही, असे पाटील म्हणाले.अतिशय भक्तिभावाने, प्रामाणिकपणाने आणि पावित्र्य राखून राम मंदिर उभे व्हावे, अशी या देशातील रामभक्तांची इच्छा आहे व म्हणूनच रामभक्त मोठ्या प्रमाणावर मंदिरासाठी निधी देत आहेत. मात्र राम मंदिर उभारणीसाठी गोळा होणाऱ्या निधीत भ्रष्टाचार होत असेल तर हे दुदैव आहे, अशी तीव्र नाराजीही जयंत पाटील यांनी व्यक्त केली. राम मंदिर बांधताना हे लोक भ्रष्टाचार करत असतील तर राम यांच्यापासून किती लांब आहे आणि रामापासून हे किती लांब आहेत हे स्पष्ट होते. रामाच्या नावाने वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय फायदे आणि आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, हे यानिमित्ताने समोर आले आहे, अशी जोरदार टीका जयंत पाटील यांनी भाजपचं नाव न घेता यावेळी केली.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या