Ticker

6/Breaking/ticker-posts

पर्यटकांसाठी पर्वणी : महाबळेश्वर-पांचगणी ही पर्यटनस्थळे खुली

 


लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

सातारा: महाबळेश्‍वर -पाचगणी ही राज्याची पर्यटनस्थळे अनेक दिवसांच्या टाळेबंदीनंतर पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांची दांडेघर नाक्यावर रॅपिड अ‍ॅन्टीजेन तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती वाईच्या प्रांताधिकारी संगिता राजापुरकर -चौगुले यांनी महाबळेश्‍वर येथील हिरडा विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत दिली. या वेळी तहसीलदार सुषमा चौधरी पाटील व माजी नगराध्यक्ष डी.एम बावळेकर उपस्थित होते. साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी टाळेबंदीच्या नियमात शिथिलता देऊन काही निर्बंध उठविले आहेत. यानुसार शनिवार (दि.१९) सकाळपासून महाबळेश्वर व पाचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत.

दरम्यान, टाळेबंदीच्या नियमात कशा प्रकारे शिथिलता देण्यात आली असल्याची माहिती देण्यासाठी वाईच्या प्रांताधिकारी संगिता राजापुरकर चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली महाबळेश्वर येथील विविध संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

गेले ६४ दिवस अत्यावश्यक सेवेत समावेश नसलेली दुकाने बंद होती. मात्र पॉझिटिव्हीटी कमी झाल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले. शनिवार व रविवारी वीकेंड लॉकडाऊन सुरू राहणार असून यात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. तर सोमवार ते शुक्रवारी अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ६४ दिवसांनी बाजारपेठा खुल्या होणार असल्याने व्यापाऱयांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी आलेल्या ७१६ जण बाधित असून पॉझिटिव्हीटी ६.८५ टक्के आहे. तर ८१० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.सकाळी ५ ते सायंकाळी ५ जमावबंदी कायम

कोविड रुग्णांचा पॉझिटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस् टक्केवारीच्या निकषानुसार जिल्हय़ाचा तिसऱया स्तरामध्ये समाविष्ट झाला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी निर्बंध शिथिल केले आहेत. शनिवारी व रविवारी वीकेंड लॉकडाऊन असल्याने बाजारपेठा सोमवारी 21 रोजी उघडणार आहेत. आठवडय़ात सर्व दिवशी सकाळी 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी 5 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचार बंदी लागू करण्यात येत आहे. त्यामुळे संचारबंदीच्या वेळेत वैध कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीस संचार करण्यास मनाई करण्यात येत आहे.


शाळा बंद पण दुकाने निर्धारित वेळेत सुरू

जिल्हय़ातील सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद राहतील. तथापि, ऑनलाईन शिक्षण सुरू असेल. वैद्यकीय महाविदयालये, नर्सिंग कोर्सेस चालू असतील. अत्यावश्यक बाबीची दुकाने, आस्थापना आठवडय़ात सर्व दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मात्र मेडिकल, औषधांची दुकाने सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत चालू राहतील. हॉस्पीटलमधील मेडिकल, औषधांची दुकाने पुर्णवेळ चालू राहतील. अत्यावश्यक नसलेली दुकाने,आस्थापना ही सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मॉल, सिनेमागृहे, नाटय़गृहे पूर्णपणे बंद राहतील.हॉटेल ५० टक्के क्षमतेने सुरू

सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ४ या वेळेत हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी असेल. आठवडय़ाच्या सर्व दिवशी सकाळी ७ते रात्री ८ या कालावधीत घरपोच पार्सल सेवेस परवानगी असेल. लॉजिंग, बोर्डींगला परवानगी असेल.

धार्मिक स्थळे बंदच...मेळाव्यांनाही बंदी

सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक स्थळे, करमणूक कार्यक्रम, मेळावे बंद राहतील. तथापि सेवेकरी यांना त्यांच्या सेवा करता येतील. बाहेरील भक्तांस प्रवेश असणार नाही. शासकीय कार्यक्रम जागेच्या ५० टक्के क्षमतेने आयोजीत करण्यास परवानगी असेल.

अत्यावश्यक सेवांमध्ये खालील बाबींचा समावेश

रुग्णालये, निदान केंद्रे, दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व सदर सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक, लस, सॅनिटायझर, मास्क व वैद्यकीय उपकरणे, व्हेटरिनरी हॉस्पिटल्स, ऍनिमल केअर शेल्टर्स व पेट फुड शॉप्स, वनाशी संबंधित सर्व कामकाज, कोल्ड स्टोरेज आणि गोदाम सेवा, किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी कन्फेक्शनरी, मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादींची सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या