Ticker

6/Breaking/ticker-posts

डिझेल शंभरीवर , दरवाढीविरोधात वाहतूकदारांचा आज 'ब्लॅक मंडे'

 लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 औरंगाबाद: डिझेल दरवाढीबरोबरच महागाई वाढल्यामुळे टायरसह स्पेअरपार्टच्या किंमती महागलेल्या आहेत. यामुळे वाहतूक व्यवसाय अडचणीत आला आहे. केंद्र शासनाच्या उदासिनतेच्या विरोधात आज दि. २८ जूनला ट्रान्स्पोर्ट मालक व चालक ब्लॅक मंडे (काळा दिवस) पाळणार आहेत.

 

औरंगाबाद गुडस ट्रान्स्पोर्ट असोसिएशनतर्फे २८ जून काळा दिवस पाळण्याचा निर्णय घेण्याता आला आहे. डिझेलच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्राची बिघडलेली स्थिती यामुळे देशात २० कोटी नागरिक आणि वाहतूक परिवारासोबत असलेल्या कुटुंबांची परिस्थिती वाईट झालेली आहे. ८५% पेक्षा अधिक वाहतूकदार लहान स्वरूपाचे उद्योजक आहेत. त्यांच्याजवळ पाच वाहने आहेत. या मधील ६५% वाहन मालक-चालकांची उपजीविका या वाहनांच्या वाहतुकीवर अवलंबून आहे. वाढत्या महागाई आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे त्यांचे अस्तिस्त्व टिकवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे.


डिझेल दरवाढीबरोबरच सध्या उद्योगांमधील उत्पादन कमी झाल्याने वाहतूकदारांना भाडे मिळत नाही. त्यामुळे ते बँकेचे हफ्ते फेडण्यातही असमर्थ ठरत आहेत. अनेक वित्तीय कंपन्यांनी वाहनांची जप्ती सुरू केली आहे. तसेच वसुलीसाठी दवाब आणला जात आहे. त्यामुळे वाहतूकदारांत चिंता निर्माण झालेली आहे. डिझेल दरवाढीबरोबर वाहतूकदारांच्या इन्शुरन्समध्ये झालेली वाढब्लॅँकेट मोरोटेरियम इतर कर आणि शुल्कासह सरकारच्या अधिकाऱ्यांकडून आणला जात असलेला दवाब तसेच रोडवरील भ्रष्ट्राचार थांबलेला नाही. या परिस्थितीच्या विरोधात राज्य व केंद्र शासनाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. याविरोधात २८ जून रोजी ट्रान्स्पोर्ट मालक व चालक शांतीपूर्ण पद्धतीने ब्लॅक डे आंदोलन करणार असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या