Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्यातील लसीकरणाबाबत मोठी बातमी; आरोग्यमंत्र्यांनी केली 'ही' घोषणा

 लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

मुंबई:  करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचे संकट घोंगावत असतानाच लसीकरणाला वेग देण्यासाठी युद्धपातळीवर पावले टाकण्यात येत आहेत. याबाबत राज्य सरकारकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली असून १८ वर्षांवरील नागरिकांची लसीकरणाची प्रतीक्षा आता संपणार आहे.महाराष्ट्र राज्य कोविड लसीकरण मोहिमेत सातत्याने आघाडीवर राहिलं आहे. मर्यादित लस पुरवठा लक्षात घेत गेले काही दिवस १८ ते ४४ या वयोगटाचे सरसकट लसीकरण न करता मध्यममार्ग काढून ३० ते ४४ वयाच्या नागरिकांना लस देण्यात येत होती. यात आता पुढचं पाऊल टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली.


राज्याती कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला वेग द्यायचा असल्याने १८ वर्षांवरील सर्व वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला राज्य सरकार मान्यता देत आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले. प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मी महाराष्ट्रातील तरुणाईला करत आहे, असेही टोपे म्हणाले. राज्यात आता १८ वर्षांवरील लसीकरण शक्य आहे. त्याप्रमाणात लससाठा उपलब्ध होत आहे, असेही टोपे म्हणाले. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील १८ ते ३० या वयोगटालाही खूप मोठा दिलासा मिळणार आहे.


म्यान, १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण मोहिमेची जबाबदारी केंद्र सरकारने राज्य सरकारवर टाकली होती. मात्र, त्यात सुसूत्रता आणण्यासाठी लसीकरण धोरणात बदल करत संपूर्ण देशात केंद्र सरकार मार्फत १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचेही मोफत लसीकरण करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. २१ जून रोजी योग दिनापासून हे मोफत लसीकरण सुरू करण्यात येईल असे मोदी यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आजपासून नव्या धोरणानुसार लसीकरण सुरू झाले असून पहिल्याच दिवशी तब्बल ८० लाखांवर नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. ' वेल डन इंडिया' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासाठी सर्वांना धन्यवाद दिले आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या