Ticker

6/Breaking/ticker-posts

SET 2021: राज्यस्तरीय पात्रता परीक्षेची तारीख जाहीर

 





लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क   )

 

*सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सेट परीक्षेची तारीख जाहीर

*रविवार, २६ सप्टेंबर २०२१ रोजी ही परीक्षा

*ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १७ मे ते १० जून २०२१ पर्यंत मुदत

 

पुणे : MH SET 2021 Date Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी घेतली जाणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षेची (SET) यंदाची तारीख विद्यापीठाने जाहीर केली आहे. ही परीक्षा यावर्षी सप्टेंबर महिन्यात होणार आहे. रविवार, २६ सप्टेंबर २०२१ रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.  सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ही परीक्षा घेतली जाते.

यासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, ३७ वी 
सेट परीक्ष २६ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १७ मे २०२१ ते १० जून २०२१ अशी मुदत देण्यात आली आहे.

सेट परीक्षेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासंबंधी तसेच या परीक्षेची अन्य संपूर्ण माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. या संकेतस्थळाची लिंक पुढे देण्यात येत आहे.

दरम्यान, मागील वर्षी २७ डिसेंबर २०२० रोजी सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा सर्वात आधी नियमित वेळापत्रकानुसार २८ जून २०२० रोजी आयोजित केली जाणार होती, मात्र करोना संसर्गामुळे ती लांबणीवर पडली होती. एकूण ६१,११४ उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, यापैकी ४,११४ उमेदवार SET परीक्षेत उत्तीर्ण झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या