Ticker

6/Breaking/ticker-posts

बँक ग्राहकांना मोठा दिलासा ! आता KYC अपडेटची मुदत वाढवली, आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क

 

नवी दिल्लीः कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या संकटात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सर्व बँक खातेदारांना मोठा दिलासा दिला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोरोनाची सद्यस्थिती पाहता केवायसीच्या नियमात मोठा बदल केलाय. केवायसी अद्ययावत (Update) न केल्यास 31 डिसेंबर 2021 पर्यंत ग्राहकांची बँक खाती बंद न करण्याच्या सूचना आरबीआयने सर्व बँकांना दिल्यात.

 

बँका ग्राहकांच्या व्हिडीओ केवायसीमार्फत खाते उघडू शकतात

याशिवाय आरबीआयने 1 डिसेंबर 2021 पर्यंत मर्यादित केवायसी वापरण्यास परवानगीही दिलीय. आता बँका ग्राहकांच्या व्हिडीओ केवायसीमार्फत खाते उघडू शकतात. केवायसी अद्ययावत उच्च जोखीम असलेल्या ग्राहकांनी कमीत कमी दोन वर्षांत एकदा, मध्यम जोखीम ग्राहकांनी 8 वर्षांतून एकदा आणि कमी जोखीम ग्राहकांनी दर 10 वर्षांनी एकदा करावे.

केवायसी का महत्त्वाचे?

केवायसी अंतर्गत बँक आपल्या ग्राहकांच्या ओळखीची माहिती घेते. जेव्हा जेव्हा एखादा ग्राहक बँक खाते उघडण्यासाठी जातो, तेव्हा त्याला आपल्या ओळखीची माहिती द्यावी लागते. जेणेकरून बँकिंग सेवांचा गैरवापर होणार नाही. उच्च जोखीम असलेल्या ग्राहकांना दर दोन वर्षांनी ते अद्ययावत करावे लागते. त्याच वेळी मध्यम जोखमीमध्ये ते 8 वर्षांत अद्ययावत करता येते. तर कमी जोखमीच्या श्रेणीमध्ये ते 10 वर्षांत अद्ययावत करण्याची मुभा आहे.

आता केवायसी पोस्ट किंवा मेलद्वारे सबमिट करणे शक्य

कोविड 19 (COVID-19) च्या दुसर्‍या लाटेमुळे स्थानिक स्तरावर लॉकडाऊन करण्यात आलाय. त्यामुळे ग्राहकांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेता स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) केवायसी (KYC) कागदपत्रे पोस्ट किंवा मेलद्वारे सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलीय.

IDBI बँकेकडून व्हिडीओ केवायसी अद्ययावत सुविधा सुरू

आयडीबीआय बँकेने व्ही-सीआयपीद्वारे केवायसी अद्ययावत करण्याची सुविधा सुरू केलीय. आयडीबीआय बँकेचे ग्राहक आता बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या व्ही-सीआयपी लिंकद्वारे त्यांच्या सोयीनुसार केवायसी प्रक्रिया सुरू करू शकतात. ही एक पूर्णपणे कॉन्टॅक्टलेस प्रक्रिया आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या