Ticker

6/Breaking/ticker-posts

दाहक वास्तव! करोना मृत्यूनं गाठला आजवरचा सर्वाधिक आकडा

 


*करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ५४ लाख ९६ हजार ३३० वर

*देशात ३२ लाख २६ हजार ७१९ रुग्णांवर उपचार सुरू

*एकूण २ लाख ८३ हजार ७१९ नागरिकांनी करोनामुळे गमावले प्राण



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

नवी दिल्ली : भारतात राष्ट्रीय स्तरावरच्या करोनाच्या आकड्यांवर नजर टाकली असता संक्रमणाचा वेग कमालीचा घसरल्याचं दिसून येतंय. त्यामुळे, करोना संक्रमणाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्रं आहे. अनेक राज्यांची आकडेवारीही समाधानकारकरित्या खाली जाताना दिसून येतेय. उल्लेखनीय म्हणजे, सोमवार आणि मंगळवारी 'तौत्के' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या राज्यांत पार पडलेल्या चाचण्यांची संख्येतही घट झालेली दिसून आली.

बुधवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात मंगळवारी (१८ मे २०२१) २ लाख ६७ हजार ३३४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत तब्बल ४५२९ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. हा आजवरचा एका दिवसातला सर्वाधिक आकडा ठरलाय. याअगोदर, मंगळवारीदेखील ४३१९ रुग्णांनी आपले प्राण गमावले होते.

याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ५४ लाख ९६ हजार ३३० वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख ८३ हजार ७१९ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत २ कोटी १९ लाख ८६ हजार ३६३ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. देशात सध्या ३२ लाख २६ हजार ७१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


*एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ५४ लाख ९६ हजार ३३०

*एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी १९ लाख ८६ हजार ३६३

*उपचार सुरू : ३२ लाख २६ हजार ७१९

*एकूण मृत्यू : २ लाख ८३ हजार ७१९

*करोना लसीचे डोस दिले गेले : १८ कोटी ५८ लाख ०९ हजार ३०२



देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण १८ कोटी ५८ लाख ०९ हजार ३०२ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील १३ लाख १२ हजार १५५ लसीचे डोस मंगळवारी देण्यात आले.

देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण १८ कोटी ५८ लाख ०९ हजार ३०२ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील १३ लाख १२ हजार १५५ लसीचे डोस मंगळवारी देण्यात आले.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, १८ मे २०२१ पर्यंत देशात एकूण ३२ कोटी ०३ लाख ०१ हजार १७७ नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय. यातील २० लाख ०८ हजार २९६ नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात अर्थात मंगळवारी करण्यात आली.



प्रत्येक दिवशीची रुग्णसंख्या
४ मे : ३,५७,२२९
५ मे : ३,८२,३१५
६ मे : ४,१२,२६२
७ मे : ४,१४,११८
८ मे : ४,०१,०७८
९ मे : ४,०३,७३८
१० मे : ३,६६,१६१
११ मे : ३,४८,४२१
१२ मे : ३,६२,७२७
१३ मे : ३,४३,१४४
१४ मे : ३,२६,०९८
१५ मे : ३,११,१७०
१६ मे : २,८१,३८६
१७ मे : २,६३,५३३


१८ मे : २,६७,३३४

प्रत्येक दिवशीची मृत्यूसंख्या
४ मे : ३४४९
५ मे : ३७८०
६ मे : ३९८०
७ मे : ३९१५
८ मे : ४१८७
९ मे : ४०९२
१० मे : ३७५४
११ मे : ४२०५
१२ मे : ४१२०
१३ मे : ४०००
१४ मे : ३८९०
१५ मे : ४०७७
१६ मे : ४१०९


१७ मे : ४३१९
१८ मे : ४५२९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या