Ticker

6/Breaking/ticker-posts

बहिणीच्या स्मृतीप्रित्यर्थ कोविड रुग्णांसाठी पाणी बॉक्सची भेट ; अजय मगरचा उपक्रम

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


शेवगाव : सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे येथील युवा कार्यकर्ते अजय मगर यांनी आपली दिवंगत बहीण प्रियंका त्रिभुवन यांच्या ४० व्या दिवसानिमित्त शेवगावच्या तीन शासकीय कोविड केअर सेंटरला पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे १२५ बॉक्स भेट दिले. या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

      


 कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शेवगावच्या डॉ.आंबेडकर भवन, त्रिमुर्ती सैनिक स्कूल व ग्रामीण रुग्णालयात अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने या रुग्णांना चांगल्या दर्जाचे पिण्याचे पाणी मिळावे, या हेतूने आपण दिवंगत बहिणीच्या स्मृतीप्रित्यर्थ १२५ पाणी बॉक्स संबंधित यंत्रणेकडे सुपूर्द केल्याचे श्री.मगर यांनी सांगितले.

      याप्रसंगी अमर जाधव, राहुल सावंत, प्रेम अंधारे, संदीप मगर, अजय साळवे, अक्षय चित्ते, राजवीर इंगळे,यंकू घुटे, नितीन मगर, स्वप्नील मगर, विशाल मगर, विकास चित्ते, किरण मगर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या