Ticker

6/Breaking/ticker-posts

अंबिका महीला बँकेच्या चेअरमनपदी सुमन गोसावी तर, व्हा.चेअरमनपदी शांता मोरे बिनविरोध

 

अहमदनगर :-  शहराच्या लौकिकात सातत्याने मानाचा तुरा रोवणाऱ्या दि.अंबिका महिला सहकारी बँकेच्या चेअरमनपदी ज्येष्ठ संचालिका सौ.सुमन गणेश गोसावी तर, व्हा.चेअरमनपदी सौ.शांता भिमराज मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

     अध्यासी अधिकारी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष बैठक पार पडली. बैठकीत दोन्ही पदाच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या. चेअरमनपदासाठी सौ. गोसावी यांच्या नावाची सूचना सौ.आशा मिस्किन यांनी तर, व्हाईस चेअरमन सौ.मोरे यांच्या नावाची सूचना सौ.शोभा खरपुडे यांनी मांडली. सूचनेला अनुक्रमे अँड.सौ.शारदा लगड व सौ. भारती आठरे यांनी अनुमोदन दिले.

      मावळत्या चेअरमन डॉ.सौ. लता फिरोदिया व व्हा.चेअरमन प्रा.डॉ.सौ. संध्या जाधव यांनी कार्यकाळ पूर्ण करण्याकामी संचालक मंडळाने सहकार्य केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संस्थापक अध्यक्ष प्रा.मेधा काळे यांनी बँकांपुढील बदलत्या आव्हानांची माहिती विशद करून नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. सर्व संचालकांना विश्वासात घेऊन बँकेच्या व सभासदांचे हिताचे निर्णय घेऊ व लोकाभिमुख कारभार करू, अशी प्रतिक्रिया नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश गायकवाड, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे सहाय्यक अधिकारी श्री.मुटकुळे यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या