Ticker

6/Breaking/ticker-posts

लाडक्या लेकीचा साधेपणाने विवाह ; कोविड केअर सेंटरला २५ हजाराची देणगी

 संवेदनशील शिक्षक बबनराव बोडखेंचे सर्वत्र कौतुक

लोकनेता न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

शेवगाव :- खरडगावचे सुपुत्र व गदेवाडी (ता.शेवगाव) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.बबनराव बोडखे यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साथरोग कायदा नियमांचे तंतोतंत पालन करून आपल्या लाडक्या लेकीचा विवाह कोणताही बडेजाव न करता अत्यंत साधेपणाने उरकून समाजापुढे आदर्श निर्माण केला तसेच अनावश्यक खर्चाला फाटा देऊन त्यांनी २५ हजार रुपयांची देणगी शेवगावच्या लोकनेते (स्व.) मारुतराव घुले पाटील कोविड केअर सेंटरला सुपूर्द केली. सरस्वतीच्या या संवेदनशील उपासकाचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे. 

श्री.बोडखे यांची सुकन्या प्रतिभा व शेवगावच्या गहिलेवस्ती येथील रहिवासी कै. सखाराम घोडसे यांचे चिरंजीव विशाल यांचा शुभविवाह गुरुवारी (दिं.२० रोजी) खरडगाव येथे मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने साजरा झाला. वधू प्रतिभा ही लाडजळगाव येथे ग्रामीण डाक सेवक तर, वर विशाल हे ठाकूर निमगावच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून सेवेत आहेत.वधूपित्याने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून कोविड रुग्णांच्या सोयी सुविधेसाठी लोकनेते (स्व.) मारुतराव घुले पाटील कोविड केअर सेंटरसाठी २५ हजार रुपयांच्या देणगीचा धनादेश कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अविनाश म्हस्के, शंकर कर्डिले यांचेकडे सुपूर्त केला.

यावेळी गटविकास अधिकारी महेश डोके, शिक्षणाधिकारी रामनाथ कराड, शिक्षण विस्ताराधिकारी तथा नोडल अधिकारी श्रीमती शैलजा राऊळ, शिक्षक नेते रघुनाथ लबडे, दत्तात्रय आरे,विषयतज्ञ त्रिंबक फफाळ, अनिल जाधव आदी उपस्थित होते.श्री.बोडखे यांचे सरपंच सौ.योगिता कृष्णा बोडखे व उपसरपंच सौ.जया एकनाथ लबडे यांनी कौतुक व अभिनंदन केले.


      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या