Ticker

6/Breaking/ticker-posts

शेणाच्या गोवऱ्या घेऊन भारतीय अमेरिकेत; विमानतळ अधिकारी हैराण

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

वॉशिंग्टन: भारतीय जगभरात कुठेही गेले तरी आपल्या मातीशी असणारी नाळ कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, कधीकधी हा प्रयत्न परदेशातील नियमांमध्ये बसत नाही.अमेरिकेच्या सीमा शुल्क आणि सीमा सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका भारतीय प्रवाशाच्या बॅगेत शेणाच्या गोवऱ्या आढळल्या. एअर इंडियाच्या विमानाने आलेल्या या प्रवाशाने शेणाच्या गोवऱ्या असलेली बॅग विमानतळावरच सोडली होती. अमेरिकेत शेणाच्या गोवऱ्यांवर बंदी आहे.

अमेरिकेच्या सीमा शुल्क आणि सीमा सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एका बॅगेत दोन शेणाच्या गोवऱ्या आढळल्या आहेत. चार एप्रिल रोजी एअर इंडियाच्या विमानाने अमेरिकेत दाखल झालेल्या एका प्रवाशाची ही बॅग आहे. अधिकाऱ्यांनी या गोवऱ्या नष्ट केल्याची माहिती देण्यात आली आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, शेणाच्या गोवऱ्यामधून संसर्गजन्य Foot-and-mouth disease फैलावण्याचा धोका आहे. हा आजार पशूंना होतो. त्यामुळे पशूंचे मालकांमध्ये या आजाराची अधिक भीती असते. सीमा शुल्क आणि सीमा सुरक्षा विभागाच्या कृषी विभागाच्या मोहिमेला यामुळे धोका निर्माण झाला असता असेही अधिकाऱ्यांनी म्हटले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या