Ticker

6/Breaking/ticker-posts

तरुणांनो काळजी घ्या! राज्यात दहा लाखांहून तरुण करोनाग्रस्त

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबईः करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून राज्यामध्ये ३१ ते ४० या वयोगटातील १० लाख ५१ हजार ५९ व्यक्तींना लागण झाली आहे. त्याखालोखाल ४१ ते ५० या वयोगटातील १८.१३ टक्के व्यक्ती बाधित आहे. २१ ते ४० या वयोगटातील १८ लाख ८७ हजार ८२४ व्यक्तींना राज्यामध्ये करोना संसर्गाची लागण झाली आहे.

यापूर्वी २१ ते ३० या वयोगटामध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक नव्हते, मात्र आता त्यामध्येही वेगाने वाढ झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसते. हे प्रमाण ८ लाख ३६ हजार ७६५ इतके म्हणजे १७.६७ टक्के नोंदवण्यात आले आहे तर ४१ ते ५० या वयोगटामध्ये संसर्ग झालेल्या व्यक्तीचे प्रमाण ८ लाख ५८ हजार ३४५ नोंदवले आहे. २१ ते ४० या वयोगटातील १८ लाख ८७ हजार ८२४ व्यक्तींना राज्यामध्ये करोना संसर्गाची लागण झाली आहे.

राज्याच्या मृत्युदर समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी तरुणांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढते असले तरीही दाखल होणाऱ्या रूग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूंचे प्रमाण अधिक नाही, असे सांगितले.


बाधीतांची टक्केवारी

राज्यात स्त्रियांमध्ये संसर्गाचे प्रमाण ४० टक्के तर पुरुषांमध्ये ६० टक्के आहे. हा पॅटर्न मागील वर्षापासून आतापर्यंत सारखाच राहिला आहे. ५१ ते ६० वयोगटामध्ये रुग्णांचे प्रमाण हे १५.०९ टक्के इतके आहे तर ६१ ते ७० या वयोगटात हे प्रमाण १०.३६ इतके आहे. मुंबईमध्ये ३० ते ३९ या वयोगटामध्ये १ लाख २५ हजार ९३ जणांना करोनाची लागण झाली असून यात ३६ टक्के महिला तर ६४ टक्के पुरुष आहेत. २० ते २९ या वयोगटात हे प्रमाण ४३ आणि ५७ टक्के इतके आहे. या वयोगटामध्येही बाधितांची संख्या आता एक लाखांच्या घरात पोहचली आहे.

वयोगट - रुग्णसंख्या - टक्केवारी

दहा वर्षापर्यंत - १४४३७६ - ३.०५

११ ते २० - ३२५८८१ - ६.८८

२१ ते ३० - ८३६७६५ - १७.६७

३१ ते ४० -१०५१०५९ - २२.२०

४१ ते ५० - ८५८३४५ - १८.१३

५१ ते ६० - ७१४३८९ - १५.०९

६१ ते ७० - ४९०४१० - १०.३६

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या