Ticker

6/Breaking/ticker-posts

चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालयाची वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी

 


चिचोंडी पाटील येथे ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करताना महसूल विभागाचे उपायुक्त गाडीलकर,डॉक्टर व कर्मचारी (छाया : सोहेल मनियार)

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नगर : तालुक्यातील चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालयात विभागीय महसूल उपायुक्त गाडीलकर, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन व सहकारी अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

 कोव्हिडचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून त्यावर उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असल्याने महत्त्वाच्या उपाययोजना करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.याप्रसंगी रुग्णांची विचारपूस केली.या दरम्यान रुग्णालयातील कर्मचारी वाढविण्याचे निर्देश देण्यात आले. रुग्णालय परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली. तसेच बाहेर रांगा लावणारे रूग्णांसाठी शेड,वाहनांचे पार्किंग शेड व व्यवस्था,पावसाळ्यापूर्वी करावयाचे रुग्णालयाची डागडुजी याविषयी सविस्तर माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली.याच बरोबर प्रत्येक वार्ड मधील कोव्हीड रुग्णांची विचारपूस करण्यात आली. तसेच चिचोंडी पाटील येथील युवकांनी  रुग्ण सेवेकरिता पुढाकार घेऊन रुग्णालयात वार्ड बॉय म्हणून काम करण्यास पुढे यावे त्यांना उचित असे मानधन दिले जाईल. असे आवाहन केले .तसेच रुग्णालयात उपलब्ध असलेल्या उपकरणांची माहिती जाणून घेतली.रुग्णालय प्रशासनास मार्गदर्शन केले.

रुग्णसेवेसाठी अहोरात्र झटणारे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले,पंचायत समितीचे सभापती सुरेखाताई संदीप गुंड,पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण कोकाटे,सरपंच मनोज कोकाटे, माजी उपसरपंच शरद पवार, संभाजी ब्रिगेडचे मा.जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे,उपसरपंच कल्पना ठोंबरे, ग्रामसेवक देवीदास मोरे, अशोक कोकाटे आदी नेते तालुक्यासह गावागावातील आरोग्य सेवेकडे प्रामुख्याने लक्ष देत आहेत. लोकांच्या व रुग्णांच्या अडी अडचणी सोडवत आहेत. ग्रामीण रुग्णालय चिचोंडी पाटील याठिकाणी लसीकरणात ५० टक्के स्थानिक चिचोंडी पाटील ग्रामस्थांना सवलत द्या अशी मागणी केली होती.

ऑनलाईन रजिस्ट्रेशन  मध्ये स्थानिक ग्रामस्थांना २०० पैकी फक्त ७ किंवा १० लस मिळत होत्या ही बाब उपायुक्त गाडीलकर, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन व रुग्णालय प्रशासन यांच्या लक्षात आणून दिली.या मागणीला प्रतिसाद देत  रेव्हेन्यू नाशिक विभाग उपायुक्त गाडीलकर, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन,नगर तालुका तहसीलदार उमेश पाटील , गट विकास अधिकारी घाडगे,डॉ. नेवसे,डॉ. कांबळे यांनी येत्या दोन दिवसानंतर चिचोंडी पाटील गावातच दररोज 200 उपलब्ध करून स्थानिक ग्रामस्थांना देणार असल्याचे सांगितले. डॉ.समुद्र रुग्णालय कर्मचारी तोडमल सिस्टर सर्व स्टाफ यांचे रुग्णाला चांगल्या प्रकारे सहकार्य लाभत आहे.

 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या