Ticker

6/Breaking/ticker-posts

'जेनेरीकार्ट मेडिसिन' अँप्लीकेशन 'कोरोना' काळात ठरणार वरदान !-पालकमंत्री

      'जेनेरीकार्ट मेडिसिन' या आँनलाईन अँप्लिकेशनचे   पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अनावरण







"जेनेरिकार्ट" कंपनीने राज्यातील पहिले "मोबाईल अँप्लीकेशन" विकसित केले. 'जेनेरीकार्ट मेडिसिन' या आँनलाईन अँप्लिकेशनचे  अनावरण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नगर येथे करण्यात आले. यावेळी  आमदार रोहित पवार, आमदार अशितोष काळे, आमदार डॉ किरण लहामटे, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, कंपनीचे  डिस्ट्रिक्ट हेड वसंत सानप उपस्थितीत होते.


अ.नगर :- "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक संचारबंदी असल्याने या काळात  औषधे खरेदी करणे सुलभ व्हावे याकरिता सामाजिकतेच्या भूमिकेतून  जेनेरिकार्ट कंपनीने 'जेनेरीकार्ट मेडिसिन' नावाचे आँनलाईन अँप्लिकेशन  सुरु केल्यामुळे ते कोरोनासाठी वरदान  ठरेल  असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

 १ मे महाराष्ट्र दिनी 'जेनेरीकार्ट मेडिसिन' या आँनलाईन अँप्लिकेशनचे  अनावरण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नगर येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास  आमदार रोहित पवार, आमदार अशितोष काळे, आमदार डॉ किरण लहामटे, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले , कंपनीचे  डिस्ट्रिक्ट हेड वसंत सानप उपस्थितीत होते. 

कंपनीचे  डिस्ट्रिक्ट हेड वसंत सानप यानी या विषयी अधिक माहिती दिली, ते म्हणाले की , सामाजिकतेच्या भूमिकेतून  जेनेरिकार्ट कंपनीने 'जेनेरीकार्ट मेडिसिन' नावाचे आँनलाईन अँप्लिकेशन  सुरु केल्यामुळे जेनेरीकार्टचे जेनेरिक औषधांचे दुकान शोधणे, औषधंच्या किमतीत किती बचत होते आणि नागरिकांना घरपोहच औषध सेवा मिळणार आहे. तसेच औषधे स्वस्त मिळणार आहेतच शिवाय डॉक्टर ऑनलाईन कन्सलटेशन, ऑनलाईन सर्व प्रकारच्या टेस्ट अशा सुविधा एका क्लिक वर मिळणार आहेत. लॅब मधील सांगितलेली टेस्ट सहज उपलब्ध होण्याविषयी मार्गदर्शन मिळेल.  प्रिस्क्रिप्शन विषयी माहिती मिळेल.  कोणती गोळी केव्हा घ्यावी याविषयी आठवण ही करून दिली जाईल. जेणेकरून वयस्कर लोकांना त्याचा खूप फायदा होईल. 

अँप्लीकेशन  'कोरोना' काळात ठरणार वरदान  !

अशा पध्दतीचे मोबाईल अँप्लीकेशन विकसित करणारी 'जनेरिकार्ट' ही राज्यातील पहिली कंपनी ठरली आहे.याकरिता कंपनीचे संचालक श्रीपाद कोल्हटकर, सलीम सय्यद व वैभव नरगुंदे यांनी गेली सहा महिण्यापासून परिश्रम घेतले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने नागरिकांकडून शासनाने निर्धारित करुन दिलेल्या नियम व आटींचे काटेकोरपणे पालन व्हावे, दररोज लागणाऱ्यां औषधांसाठी घराबाहेर पडण्याची वेळ येऊ नये याकरिता हे मोबाईल अँप्लिकेशन खूप मोठा आधार ठरेल हे मात्र निश्चित ! असा विश्वास सानप यांनी व्यक्त केला. 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या