Ticker

6/Breaking/ticker-posts

थरार :आईला मारहाण केली म्हणून मुलाने वडिलांवर झाडल्या गोळ्या !लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

आष्टी: ( जि. बीड) आईला मारहाण झाल्याने रागाच्या भरात आष्टी येथील विनायकनगर भागात मुलानेच पित्यावर तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी अहमदनगरला हलवण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. गोळीबार करणारा मुलगा नुकताच सैन्यातून निवृत्त झालेला आहे. आष्टी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
संतोष किसन लटपटे ( वय ५० ) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्यावर मुलगा किरण संतोष लटपटे   (वय २४) याने घरगुती वादातून तीन गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या संतोष लटपटे यांच्या पोटावर लागल्याने ते गंभीर जखमी झाले. जखमी संतोष लटपटे यांना दारूचे व्यसन होते. यातून घरात सातत्याने छोटे-मोठे वाद होत असत. यातून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीची सध्या कसून चौकशी सुरू आहे.

संतोष लटपटे तीन महिन्यांपूर्वी सैन्य दलातून निवृत्त घेऊन गावी आल्याची माहिती आहे. त्याच्याकडे बंदुकीचा परवाना होता. गुरुवारी सायंकाळी याच बंदुकीतूनच त्याने पित्यावर तीन गोळ्या झाडल्या. आरोपी किरण लटपटे याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, त्याचे वडील संतोष लटपटे यांनी दारू पिऊन आईला मारहाण सुरू केली होती. यानंतर मला राग अनावर झाल्याने बंदुकीतून गोळ्या झाडल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व पोलीस निरीक्षक सलीम चाऊस याप्रकरणी तपास करीत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या