Ticker

6/Breaking/ticker-posts

दहावीची पुन्हा 'परीक्षा'? २०० गुणांचा एकच पेपर?

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

पुणे:- दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला शिक्षण विभाग पुन्हा एकदा 'परीक्षे'कडे वळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दहावीचा निकाल लावण्यासाठी विद्यार्थ्यांना २०० गुणांचा एकच पेपर द्यावा लागेल, अशा चर्चा सुरू असून, यामुळे विद्यार्थी आणि पालकांत संभ्रम निर्माण केला जात आहे. याबाबत शिक्षण विभागाकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.

दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर अंतर्गत मूल्यमापन केले जाईल, असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यासाठी तज्ज्ञांची समिती गठीत केली होती. या घडामोडींना आता १५ दिवस उलटूनही मूल्यमापन कसे होणार, याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही. आता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २०० गुणांचा एकच पेपर असेल, असा प्रस्ताव शिक्षण विभाग राज्य सरकारला जाहीर करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत पुष्टी झाली नसली, तरी पालक आणि विद्यार्थी यांच्यात संभ्रम निर्माण केला जात आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शिक्षण विभागाने देणे अपेक्षित आहे. माध्यमिक मंडळ किंवा शिक्षण विभागाकडून दहावीच्या विद्यार्थ्यांबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

' सरकारने भूमिका स्पष्ट करावी'

दहावीबाबतच्या गोंधळामुळे परीक्षा होणार की नाही होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने त्वरित शंकानिरसन करावे. अंतर्गत मूल्यमापन कोणत्या निकषांवर होणार, हेही स्पष्ट करावे. सरकारने लवकरात लवकर त्यांची अधिकृत भूमिका जाहीर करावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या