Ticker

6/Breaking/ticker-posts

SBI चा 40 कोटी ग्राहकांना अलर्ट! मोबाईलमध्ये ही माहिती सेव्ह असल्यास बँक खाते रिकामे झालेच समजा

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्लीः-   वाढत्या फसवणुकीच्या प्रकारांमुळे एसबीआयनं ग्राहकांना सतर्क केलेय. ग्राहकांची अगदी लहान चूकही त्यांचे खाते रिकामी करण्यास कारणीभूत ठरू शकेल. बँकेच्या वेबसाईटनुसार, कोणालाही या अलर्टची माहिती नसल्यास त्यांचे खाते रिकामी होण्याची दाट शक्यता आहे.

 

तसेच हॅकर बँक खात्यातून पैसे चोरू शकतात. ही फसवणूक टळावी म्हणून बँकेने ग्राहकांना त्यांच्या स्मार्टफोनमधील कोणतेही बँक तपशील न ठेवण्याची विनंती केलीय. कोणालाही आपला ओटीपी म्हणजेच एक वेळ संकेतशब्द, पिन क्रमांक, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड सीव्हीव्ही नंबर कधीही सांगू नका.

बँकेच्या मते, बहुतेक फसवणूक अशा प्रकारे केल्या जात आहेत. फोन कॉलवर बँकेचे नाव विचारल्यानंतर आपल्याला कार्ड ब्लॉक करा आणि कार्डच्या मागील बाजूस असलेला पासवर्ड, ओटीपी किंवा सीव्हीव्ही नंबर बदलण्यास सांगितले जाते. ग्राहकांना अशा प्रकारची कोणतंही काम न करण्याचा बँकेने सल्ला दिलाय.

आपल्या एटीएमचा स्वतःच वापर करा. आपला एटीएम किंवा इतर कोणतेही कार्ड वापरू नका. याशिवाय आपल्या एटीएम कार्डाचा तपशीलही कोणाबरोबर शेअर करू नका. असे केल्यास आपल्या खात्यातील माहिती लीक होऊ शकते. तसेच परवानगीशिवाय व्यवहार केले जाऊ शकतात. ग्राहकांनी सार्वजनिक डिव्हाईस, ओपन नेटवर्क आणि विनामूल्य वाय-फाय झोनसह ऑनलाईन व्यवहार करू नयेच. बँकेच्या मते सार्वजनिक संसाधनांच्या वापरामुळे ग्राहकांची वैयक्तिक माहिती लीक होण्याचा मोठा धोका असतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या