Ticker

6/Breaking/ticker-posts

MPSC exam: मुख्यमंत्र्यांना फोन करून राज ठाकरेंनी केली 'ही' मागणी

 



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

*मुख्यमंत्र्यांची भूमिका सकारात्मक असल्याची माहिती आहे.

*मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे समजते.

मुंबई: राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी MPSC परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माणसेनेचे अध्यक्ष  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यावेळी फोनवर राज यांनी MPSC ची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे समजते. मात्र मुख्यमंत्र्यांची भूमिका सकारात्मक असल्याची माहिती आहे.

एमपीएससीची पूर्व परीक्षा रविवारी ११ एप्रिलला घेण्यात येत आहे. मात्र, राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. कोरोनाचा झालेला उद्रेक पाहता एमपीएससी परीक्षेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ शकतो, असे अनेकांचे म्हणणे आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांना यापूर्वीच कोरोना झालेला देखील आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात या परीक्षेची तयारी करणाऱ्या वैभव शितोळे या तरुणाचा मृत्यू देखील झालेला आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांकडून आता ही संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी होत आहे.


विद्यार्थी ही परीक्षा पुढे ढकलण्याची आता मागणी करत असले तरी गेल्या महिन्यात एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर पुण्यात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले होते. मात्र, आता विद्यार्थ्यांची भूमिका पूर्णपणे बदलली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांना फोन केला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वीकेंड लॉकडाऊनच्या निर्णयाला सहकार्य करण्याचे आव्हान केले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या या चर्चेची माहिती जाहीर केली होती. पत्रकार परिषदेत बोलताना राज यांनी वाढत्या करोनाच्या कारणावर देखील मत मांडले होते. परराज्यातून येणारे लोक मोठ्या प्रमाणावर राज्यात येत असून त्यांची करोनाची चाचणी होत नाही. यामुळे राज्यात कोरोना वाढल्याचे ते म्हणाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या