लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नवी दिल्लीः जर तुम्हाला कमी पैशात महिना
भर अनलिमिटेट कॉलिंग आणि रोज २ जीबी इंटरनेट हवे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची
बातमी आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेल (BSNL) ने आपला सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लान लाँच केला आहे.
फक्त ४७ रुपयांत होणार रिचार्ज
फक्त ४७ रुपयांत मिळणाऱ्या या BSNL युजर्संना २८ दिवसापर्यंत
अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १ जीबी इंटरनेट तसेच 100 SMS मिळणार
आहे. बीएसएनएलच्या या नवीन प्लानमुळे एयरटेल (Airtel), जिओ
(Jio) आणि वोडाफोन-आयडिया (Vi) यांच्यातील
स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे. BSNL ने ही ऑफर आणल्याने काही जण याला मास्टरस्ट्रोक म्हणत आहेत.
एयरटेल, जिओ आणि Vi चे स्वस्त प्लान
रिचार्ज चाटवर नजर टाकल्यास प्रायव्हेट टेलिकॉम क
कंपनी एयरटेल कंपनी १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत दोन प्रीपेड प्लान ऑफर करीत आहे.
पहिला प्लान ७९ रुपयांचा आहे. तर दुसरा प्लान ४९ रुपयांचा आहे. या दोन्ही
प्लानमध्ये युजर्संना फक्त 200MB चा डेटा मिळतो. तर जिओने ५१ रुपयेआणि २१ रुपयांचे प्लान ऑफर केले आहेत.
परंतु, हे दोन्ही टॉप अप प्लान्स आहेत. ज्यात कोणतीही
वैधता मिळत नाही. याप्रमाणे वोडाफोन आयडियाचे ४८ रुपये आणि ९८ रुपयांचे दोन
प्लान्स ऑफर केले आहेत. परंतु, यातील फायदे मर्यादीत आहेत.
0 टिप्पण्या