Ticker

6/Breaking/ticker-posts

राघूहिवरे गावचे सरपंच दहीफळे यांचे निधन

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पाथर्डी :-तालुक्यातील राघूहिवरे गावचे विद्यमान सरपंच भाऊसाहेब आसराजी वय वर्षे 55 यांचे आज सोमवार दिनांक 12 एप्रिल रोजी निधन झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

 दहिफळे यांच्या निधनामुळे राघू हिवरे गावासह परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. चार महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सरपंच दहिफळे यांच्या गटाने दुसऱ्यांदा ग्रामपंचायतची सत्ता मिळवत सरपंचपदी दहिफळे विराजमान झाले. दिलखुलास परंतु एक धाडशी सरपंच म्हणून त्यांची या भागात ओळख निर्माण झाली होती. या अगोदरही त्यांच्या सौभाग्यवती या गावच्या सरपंच होत्या. दहिफळे यांच्या निधनामुळे गावात कडकडीत बंद पाळून शोक व्यक्त करण्यात आला. 

 शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोणा मोठ्या प्रमाणात पसरल्याने या  कोरोनामुळेमुळे गावातील अनेक लोकांसह गावच्या सरपंचालाही आता आपला जीव गमावण्याची वेळ ग्रामीण भागात आली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या