Ticker

6/Breaking/ticker-posts

मदतीसाठी शहर काँग्रेसचे पाउल पडते पुढे .. केले रक्तदान शिबिराचे आयोजन..!

 


(महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त काँग्रेसच्या वतीने अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांचे नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विशेष निमंत्रित तथा विद्यार्थी कॉंग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, शहर जिल्हा सहसचिव ॲड. सुरेश सोरटे, तौसिफ बागवान, शरिफ सय्यद, फैसल सय्यद आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.)

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर: कोरोनामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. अहमदनगर ही याला अपवाद नाही. रक्ताची गरज लक्षात येता अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी मदतीसाठी पुढे सरसावली असून पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचे मार्केट यार्ड परिसरात आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मोठ्या संख्येने युवकांनी शिबिरात सहभागी होत रक्तदान केले आहे. 

 महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त काँग्रेसच्या वतीने अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांचे नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरातप्रदेश कार्याध्यक्ष आ.प्रणितीताई शिंदे, आ.डॉ.सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. 

 यावेळी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विशेष निमंत्रित तथा विद्यार्थी कॉंग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, शहर जिल्हा सहसचिव ॲड. सुरेश सोरटे, तौसिफ बागवान, शरिफ सय्यद, फैसल सय्यद आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा यावेळी बोलताना म्हणाले की, शहरामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेता शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या सूचनेवरून नगर शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्ताची गरज भासल्यास नागरिकांनी काँग्रेस पक्षाशी संपर्क साधावा. काँग्रेस कार्यकर्ते मदतीसाठी निश्‍चितपणे पुढे येतील. 

 अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख म्हणाले की, कोरोना मुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. नागरिकांच्या मनात या विषयी अनेक शंका आहेत. परंतु रक्तदान करणे हे अत्यंत सुरक्षित असून नागरिकांनी मनामधील शंका दूर करत रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन यावेळी शेख यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अज्जूभाई शेख, तौसिफ बागवान, शरिफ सय्यद, फैसल सय्यद आदींनी परिश्रम घेतले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या