Ticker

6/Breaking/ticker-posts

मानवता हाच खरा धर्म .. ! ,हिंदू आजीच्या पार्थिवाला मुस्लिम तरुणाने दिला मुखाग्नी

 जाति - पाती अन् बेगड्या धर्मप्रेमाचे साखळदंड पडले गळून  ; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समीर शेखचे सर्वत्र कौतुक

लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

शेवगाव :- पवित्र रमजान महिन्याचा कडक रोजा (उपवास) असतानाही शेवगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते समीर शेख यांनी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या एका हिंदुधर्मीय आजीच्या पार्थिवाला मुखाग्नी देऊन समाजापुढे नवा आदर्श उभा केला आहे. जाती-धर्माच्या भिंती छेदून दोन दिवसापूर्वी समीरने केलेल्या या अद्वितीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

      कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका ७५ वर्षीय आजीने मंगळवारी (दिं.२७ रोजी) शेवगावच्या एका खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांचा शिक्षक मुलगा व सून हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याने उभय दांपत्य रुग्णालयात उपचार घेत आहे.

     आई-वडील रूग्णालयात. त्यातच जवळच्या नातेवाईकांनी अंत्यविधीसाठी पाठ फिरवल्याने सतरा वर्षीय नातीची आजीच्या अंत्यसंस्कारासाठी धावपळ सुरू होती. " तिची " ही धावपळ, लगबग समीर शेखला स्वस्थ बसू देईना. त्याने तिला मदतीचा हात देत सरण रचण्यापासून ते मुखाग्नी  देईपर्यंतचे सर्व सोपस्कार पार पाडले. राख सावडणीसाठीही त्याने आपले हात पुढे केले.

       समीर शेख हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते असून त्यांचा सामाजिक कार्यक्रमात सततचा सहभाग असतो. ते सध्या लोकनेते मारुतराव घुले पाटील कोविड सेंटरमध्ये रुग्णाची मनोभावे सेवा करत आहेत. त्यांचे हे कार्य हिंदू-मुस्लिम धर्मीयांमध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या