Ticker

6/Breaking/ticker-posts

मधुमेह आहे ? मग ‘ही’ डाळ खा; डायबिटीजची ‘डाळ’ शिजणार नाही

 








लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नवी दिल्ली : सध्या जगभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्याचबरोबर मृतांची संख्याही वाढत आहे. मात्र कोरोना व्यतिरिक्त असे अनेक रोग आहेत ज्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही अन्यथा ते प्राणघातक ठरु शकते आणि त्यापैकी एक आजार आहे मधुमेह. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसारजगभरात ४३ कोटी लोकाना मधुमेह आहे .आणि दरवर्षी शुगरच्या या आजारामुळे 16 लाख लोकांचा मृत्यू होतो. मात्र आपण आहारात थोडे बदल केले तर आपण मधुमेह नक्की नियंत्रणात ठेवू शकता. यासाठी तूरीची डाळही आपल्यासाठी अधिक फायदेशीर ठरते.

शुगर नियंत्रित करण्यासाठी डाळींचे सेवन करा

ब्लड शुगर हा एक असाध्य रोग आहे आणि हा रोग एकदा झाल्यावर आपण केवळ आयुष्यभर यावर नियंत्रण ठेवू शकता, पूर्णपणे बरा करू शकत नाही. जेव्हा शरीर इंसुलिन संप्रेरक (Insulin) तयार करण्यास असमर्थ असते तेव्हा रक्तातील ग्लूकोजची पातळी वाढते. ही परिस्थिती दीर्घकाळ राहिल्यास मधुमेह हा आजार बनतो. मधुमेहाचे रुग्ण आहारात बदल करुन या आजारावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवू शकतात.

या कारणांमुळे डाळी मधुमेहामध्ये ठरतात फायदेशीर

*याचे कारण म्हणजे तुरीची डाळ हे प्रोटीनचे पॉवर हाउस मानले जाते.
*याशिवाय तुरीच्या डाळीमध्ये लोह, झिंक, फोलेट आणि मॅग्नेशियम सारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात.
* तूरडाळीमध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते. यात विरघळणारे आणि अघुलनशील फायबर दोन्ही असतात.
* डाळीचे ग्लिसेमिक इंडेक्स देखील कमी आहे आणि त्यात जटिल कार्बोहायड्रेट्स असतात.
* या सर्व वैशिष्ट्यामुळे शरीरात रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यास मदत होते, तूरडाळीचे सेवन करणे मधुमेहाच्या रुग्णांना खूप फायदेशीर मानले जाते.

 

वर्ष 2018 मध्ये झालेल्या संशोधनात असेही सिद्ध झाले आहे की, तूरडाळ किंवा तूरडाळीचे पाणी पिण्यामुळे साखर नियंत्रित होण्यास मदत होते. तूरडाळ व्यतिरिक्त तुम्ही चणा डाळ, राजमा, हिरवी मूग डाळ, चणा किंवा छोले देखील घेऊ शकता. या सर्व गोष्टी रक्तातील साखर नियंत्रित करण्यास देखील मदत करतात.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या