Ticker

6/Breaking/ticker-posts

खा. सुजय विखेंनी आणलेल्या बॉक्समध्ये नेमकं काय होतं?, इंजेक्शन्स खरंच आणली तर ती कोणाला वाटली हे जाहीर करावे; राष्ट्रवादीचा हल्ला

 


 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर:-नगर जिल्ह्यातील रुग्णांसाठी दिल्लीहून रेमडेसिवीर इंजेक्शन  आणल्याचा दावा केलेले नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्याबद्दल राष्ट्रवादीने शंका उपस्थित केली आहे. विखेंचा हा दावा संशयास्पद वाटत असून त्यांनी ही इजेक्श्न्स खरंच आणली असतील तर ती कोठे आणि कोणाला वाटली हे जाहीर करावे,’ अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे. विखेंनी नगरमधील जनतेत संभ्रम निर्माण करून या जनतेची चेष्टा करण्याचे पाप करू नये,’ असेही चाकणकर यांनी सुनावले आहे.


गेल्या आठवड्यात डॉ. विखे यांनी दिल्लीहून एका खासगी विमानातून रेमडेसिवीर इंजेक्शन्स आणून नगर जिल्ह्यातील रुग्णालयांना दिली. त्यांनी स्वत:च तसा एक व्हिडिओ प्रसारीत केला. शिर्डीत आलेल्या विमानातून बॉक्स उतरवताना आणि ती वाहनातून नेली जात असतानाचेही व्हिडिओत दिसले.

यावर शंका घेणारे ट्विट चाकणकर यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे. खासदार सुजय विखेंचा व्हिडीओ आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून १० हजार इंजेक्शन आणल्याचा केला गेलेला दावा हे संपूर्णपणे संशयास्पद आहे. एकीकडे नगर जिल्ह्यातील नागरिक इंजेक्शनसाठी मदतीची याचना करत असताना असे व्हिडीओ ही नागरिकांची चेष्टा आहे. एक तर सुजय विखेंनी त्या बॉक्समध्ये काय होते, हे स्पष्ट करावे आणि जर रेमडेसिवीर असतील तर ते कुणाला वाटले अथवा सामान्य जनतेला ते कुठे मिळतील याची माहिती द्यावी. नगरमधील जनतेत संभ्रम निर्माण करून, या जनतेची चेष्टा करण्याचे पाप करू नये.

चाकणकर यांनी पुढे म्हटले आहे की, ‘राज्यभरात सध्या या रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. नगरसह महाराष्ट्रातून आमच्या महिला भगिनींचे फोन येतात. आम्ही पक्षाच्या आणि सरकारच्या मध्यमातून त्यांना मदत करीत असतो. विखेंनी जर आम्हाला त्यांच्या वाटप केंद्राचा संपर्क क्रमांक दिला तर आम्ही तो आमच्या महिलांना देऊन तेथून इंजेक्शन घेण्यास सांगू. अर्थातच ही वेळ आरोपप्रात्यारोप करण्याची नाही. राजकारण करण्याचीही नाही. सध्या जनता सैरभर झाली आहे. अशा परिस्थितीत जनतेची चेष्टा करू नये. त्यामुळे विखे यांनी ज्या पद्धीने इंजेक्शन्स आणल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल केला, त्याच पद्धतीने या प्रश्नांची उत्तरे देणारा व्हिडिओ करून जनतेची चेष्ठा करणे थांबवावे,’ असेही चाकणकर यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या