Ticker

6/Breaking/ticker-posts

महाराष्ट्र सरकारसह माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सर्वोच्च दणका ..! आव्हान याचिका फेटाळली ..

 








लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्ली : -परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपासंदर्भामधील प्रकरणात सीबीआय चौकशी टाळण्याचा प्रयत्न करणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरूद्ध महाराष्ट्र सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आव्हान याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यावेळी ही याचिका फेटाळली आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला १०० कोटी वसुलींचे टार्गेट दिल्याचा धक्कादायक आरोप लावला होता. मुंबई हायकोर्टानं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय दिला आहे. याप्रकरणात अनिल देशमुख यांनी आपली बाजू ऐकूनच घेतली नाही. त्यामुळे सीबीआयकडून होऊ घातलेली आपली चौकशी रोखावी, अशी मागणी केली होती. मात्र, याप्रकरणात सीबीआय चौकशीचा निर्णय योग्य असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला आहे.

यामुळेच आता पुन्हा एकदा त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, याप्रकरणासंदर्भात जे काही आरोप झालेले आहेत ते आरोप गंभीर आहेत. गृहमंत्री यांनी राजीनामा दिला असला तरी उच्च न्यायालयाचा सीबीआय चौकशीचा निर्णय अयोग्य म्हणता येणार नाही. सीबीआय चौकशीचे आदेश आल्यानंतर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला. पण यापूर्वी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले तेव्हा ते पदावरच होते. याप्रकरणाचे एकूण गांभीर्य लक्षात घेता याप्रकरणाची स्वतंत्र चौकशी होण्याची गरज आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या