Ticker

6/Breaking/ticker-posts

नोकरी बदलल्यास आता ग्रॅच्युइटी सुद्धा करता येणार पीएफसारखीच ट्रान्सफर

 


लोकनेता न्यूज

  ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्लीः खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांनी यापुढे नोकरी बदलल्यास त्यांना कोणतंही नुकसान होणार नाही. कारण आता पीएफसारखी ग्रॅच्युइटीची रक्कम देखील हस्तांतरित करता येणार आहे. त्यासाठी लवकरच ग्रॅच्युइटी पोर्टेबिलिटीची सुविधा सरकार राबविणार आहे. याअंतर्गत  बनवता येणार आहे.

 

माध्यमांच्या वृत्तानुसार, कामगार मंत्रालय युनियन आणि उद्योग संघटना यांची यासंदर्भात बैठक झाली. ज्यामध्ये ग्रॅच्युइटीला सीटीसीचा भाग बनविण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. नवीन नियमात सामाजिक सुरक्षा कायद्यांतर्गत समावेश असण्याची शक्यता आहे. या निर्णयाबाबत लवकरच सरकारकडून अधिसूचना जारी केली जाऊ शकते.

ग्रॅच्युइटी कायद्यात दुरुस्ती

आतापर्यंत ग्रॅच्युइटी कर्मचार्‍यांना पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी अॅक्ट 1972 अंतर्गत देण्यात येते. ही रक्कम पाच वर्ष किंवा त्याहून अधिक काळ कंपनीत काम केलेल्या कर्मचार्‍यांना दिली जाते. कोरोना कालावधीत कामगार व्यवहार समितीमधील संसदीय स्थायी समितीने आपल्या अहवालात हा कालावधी 5 ते एक वर्ष करण्याची शिफारस केली. ज्यामुळे नोकरदारांना नोकरी बदलण्यावर ग्रॅच्युइटीचा लाभ मिळू शकेल. लवकरच यासंदर्भात नवीन धोरणे बनविली जातील, असा विश्वास आहे.

ग्रॅच्युइटी हस्तांतरण उपलब्ध असेल

मीडिया रिपोर्टनुसार, सरकार युनियन आणि उद्योग यांच्यातील रचना बदलणार आहे. अशा परिस्थितीत खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पीएफप्रमाणे ग्रॅच्युइटी हस्तांतरित करण्याचा पर्याय मिळेल. कामाचे दिवस वाढविण्याच्या प्रस्तावावरही विचार केला जात होता. त्याअंतर्गत 15 ते 30 दिवस चर्चा सुरू होती. उद्योगाने यावर सहमती दर्शविली नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या