Ticker

6/Breaking/ticker-posts

१० वी , १२वी ची परीक्षा पुन्हा पुढे ढकलली !

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )


मुंबई: दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत काय निर्णय घ्यायचा याविषयी शालेय शिक्षण विभाग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज बैठक झाली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्याबाबत चर्चा झाली. कोरोना रुग्णसंख्येतील वाढ पाहता परीक्षा पुढे ढकलाव्यात, असे मत या बैठकीत मांडण्यात आले दरम्यान,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वर्षा गायकवाड यांच्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

▪️इयत्ता 10 वी 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची होती मागणी.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे ट्विटपरीक्षा पुढे ढकलण्याबाबत मोठा निर्णय

राज्यात रविवारी 63 हजार कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. परीक्षा जवळ येत असताना राज्य सरकारने निर्णय न घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. राज्यातील कोरोना परिस्थिती आणि प्रस्तावित लॉकडाऊनचा निर्णय पाहता राज्य सरकार दहावी बारावी परीक्षांबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने या परिस्थितीचा विचार करुन दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. दहावीची परीक्षा आता जून महिन्यात होणार आहे. तर बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस नियोजित आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या