Ticker

6/Breaking/ticker-posts

मंत्री शंकरराव गडाख पती,पत्नी कोरोना पॉझिटिव्ह !

 विनाकारण घराबाहेर न पडण्याचे केले आवाहन








लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर :राज्याचे मृद व  जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. दोघेही होम क्वारंटाईन झाले आहेत.मंत्री शंकरराव गडाख पाटील यांनीच ही माहिती ट्विट करुन दिली आहे. गडाख यांच्या वाहन चालकाची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील यांच्या पत्नी आणि नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीताताई गडाख यांना कोरोना संक्रमण झाले आहे. यानंतर मंत्री शंकरराव गडाख पाटील यांनी स्वत:ला १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करुन घेतले आहे. दरम्यान, आज  गडाख पाटील यांचा स्त्राव नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

१७ जुलै रोजी माझी पत्नी सुनिता यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझाही स्वब दिलेला आहे. त्यामुळे मी स्वतः होम कोरंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. आपणही आपल्यासह कुटुंबीयांची काळजी घ्या, असे गडाख पाटील यांनी याबाबतची माहिती देताना ट्विटमध्ये म्हटले आहे.

मंत्री शंकरराव गडाख हे  उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. उस्मानाबाद जिल्हयात कोरोनाचे संकट असताना देखील पालकमंत्री गायब असल्याने टीका होत होती. गडाख हे २६ जानेवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर उस्मानाबाद जिल्ह्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत होती. तर दुसरीकडे भाजपने पालकमंत्री गडाख यांनी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर यावे, असे पत्रक काढले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या