Ticker

6/Breaking/ticker-posts

माने बाबा व पुढील पिढीने लोप पावत चाललेली संस्कृती जोपासली - हरजितसिंग वधवा

*आलेची वडी विकणारे नारायण माने आरोग्यदूत पुरस्काराने सन्मानित


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अ-नगर - नगर शहरात मागील 75 वर्षांहून अधिक काळापासून आलेची वडी विकणारे नारायण माने या 91 वर्षांच्या बाबांना, जे आजही नित्यनियमाने शहरातील विविध रस्त्यांवरून फिरून हाच व्यवसाय करतात त्यांना नगर जल्लोष (ट्रस्ट) परिवाराने नगरचे ‘आरोग्यदूत’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले.

हा पुरस्कार ‘घर घर लंगर’चे प्रणेते हरजीतसिंग वधवा, ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, उपव्यवस्थापक अजय म्याना, उडान फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र तोरणे, ट्रस्टचे अध्यक्ष सागर बोगा यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी श्री. माने यांना नगर जल्लोषच्या वतीने व स्तिमित राशीनकर यांच्या सहकार्याने 2-3 महिन्यांचा किराणा ‘उडान’चे राहुल सप्रे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त अमोल बागूल व नारायण मंगलारप, नगर जल्लोष परिवारातील दीपक गुंडू, श्रीनिवास इप्पलपेल्ली, अमोल नागपुरे, अरविंद मुनगेल, विराज म्याना यांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी बोलताना श्री. हरजीतसिंग वधवा म्हणाले की, कोरोना काळात आम्ही ज्याप्रमाणे काम करीत आहोत. त्याप्रमाणेच विविध सामाजिक संस्थांनी काम केले व करीत आहेत. नगर जल्लोष परिवार त्यापैकीच एक आहे. परिवारातील सदस्यांनी कोरोना काळात उल्लेखनीय काम केले आहे. श्री. माने यांनी लोप पावत चाललेली संस्कृती जपली असून, पुढची पिढीही ती जोपासत आहे. माझ्या मते आज नगर शहरातील प्रत्येकास ते माहिती आहेत. त्यांचा गौरव केल्याबद्दल समाधान आहे, असे ते म्हणाले.

अधीक्षक अभियंता संतोष सांगळे म्हणाले की, नगर जल्लोषची टीम समाजासाठी चांगले काम करणारी संस्था आहे. त्यांच्या विविध कार्यक्रमांना मी स्वतः उपस्थित राहिलो आहे. येथे उपस्थित प्रत्येकाने माने बाबा यांची आले पाकवडीची चव चाखलेली आहे. त्यांनी त्यांच्या कामात ऊन, वारा, पाऊस असो कायम सातत्य ठेवले. समाजातील तरुण पिढीने त्यांच्यापासून बोध घ्यावा, असेच हे व्यक्तिमत्त्व आहे. आज 91 वय असूनही ते नित्यनियमाने आपला व्यवसाय करतात. नगर जल्लोषने अशा व्यक्तिमत्त्वांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. श्री. माने यांना आरोग्यदूत पुरस्काराने गौरविले याचा विशेष आनंद वाटतो, असे सांगितले. यावेळी जितेंद्र तोरणे यांनी माने बाबांच्या कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष रत्नाकर श्रीपत, संतोष दरांगे, सचिन बोगा, अक्षय अंबेकर, सुनील मानकर, राकेश बोगा, गणेश साळी, दीपक गुंडू, रोहित लोहार, नीलेश मिसाळ, योगेश म्याकल, प्रशांत भंडारी, विकास जाधव, विराज म्याना, ज्ञानेश्वर भगत, राहुल आडेप, अक्षय हराळे, अमोल तांबे, राजेंद्र निफाडकर, इरफान शेख, आदित्य फाटक, अक्षय धाडगे, प्रशांत विधाते, अभिजीत ताठे, अजय दिवटे, रोहित चिपोळे, यांनी परिश्रम घेतले.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या