Ticker

6/Breaking/ticker-posts

मोठी बातमी : महाराष्ट्रात सर्वांनाच मिळणार ‘मोफत लस’ ..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )


मुंबई : सध्या देशामध्ये एकच चर्चा आहे ती म्हणजे कोरोना. कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. आज वाढत्या रुग्णसंख्येचा ताण आरोया यंत्रणांवर पडत आहे. यासाठी शासनाने आता लसीकरणावर भर दिला आहे. आता ठाकरे सरकारने मोठी घोषणा केली आहे.

राज्यातील सर्वच नागरिकांना मोफत लस देणार असल्याचं जाहीर करण्यात आले आहे. मोफत लसीकरणाचा कार्यक्रम राज्य सरकारच्या तिजोरीतून हाती घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

देशातील लोकांना मोठ्या संख्येने लस दिली जावी, यासाठी 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांच्या लसीकरणासाठीही परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार 1 मे पासून 18 वर्षापुढील युवकांनाही कोरोनाची लस मिळणार आहे.

मागच्या कॅबिनेटमध्ये याबाबत चर्चा झाली होती. त्यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यास होकार दिला होता, असे नवाब मलिक यांनी जाहीर केल आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या