Ticker

6/Breaking/ticker-posts

‘आता सीबीआय चौकशीत तरी राजकारण होता कामा नये’-आ.पवार

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर: उच्च न्यायालयाने दिलेल्या दिलेल्या निर्णयाचा मान ठेवूनअनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. आता सीबीआय चौकशीत तरी राजकारण होता कामा नये. त्यावर न्यायालयाचेही लक्ष असेल अशी अपेक्षा करूया, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.

कर्जत जवळील गायकरवाडी येथे पवार यांच्या पुढाकारातून मोठे कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. त्याची पाहणी करण्यासाठी पवार आले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. केंद्राची पाहणी करून झाल्यावर प्रसार माध्यमांनी त्यांना मंत्री देशमुख यांचा राजीनामा व सीबीआय चौकशीचा आदेश यासंबंधी विचारले असता पवार म्हणाले, ‘तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांनी राजीनामा विरोधकांच्या आरोपांमुळे दिलेला नाही, तर न्यायालयाने चौकशीचा आदेश दिल्यानंतर आहे. विरोधक नेहमीच आरोप करीत आले आहेत. त्यांच्या केवळ आरोपांना महत्त्व देण्याचे कारण नाही. ज्यांनी आरोप केले, ते मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीरसिंग याचाही मुद्दा राहिला नाही, तर अॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. ही चौकशी सुरळीत व्हावी, यासाठी राजीनामा देणे उचित वाटल्याने हे पाऊल उचलण्यात आले. मात्र, आता सीबीआयकडून ही चौकशी नि:पक्षपणे व्हायला हवी. त्यासाठी या प्रक्रियेवर न्यायालयाचे लक्ष असेल अशी अपेक्षा करू. जर यातही राजकारण आणले गेले तर ते चुकीचे ठरेल,’ असेही पवार म्हणाले.

राजीनामा देण्यास उशीर का झाला यासंबंधी बोलताना ते म्हणाले, ‘विरोधकांनी यामध्ये केवळ आरोप केले होते. विरोधी पक्षाने केवळ राजकीय हेतूनेच हा मुद्दा उचलला होता. अशा राजकीय आरोपांकडे आम्ही फारसे लक्ष देत नाही. त्यामुळे त्यावेळी देशमुख यांनी राजीनामा दिला नसावा. एखाद्या व्यक्तीवर विश्वास असतो, तेव्हा लगेच राजीनाम्याची अपेक्षा ठेवता येत नाही. मात्र, न्यायालयाने दखल घेतल्यानंतर त्याचा मान ठेवावा लागतो.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या