लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई : -महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वाढती रुग्णसंख्या सध्या चिंतेचा विषय झाला आहे. रुग्णवाढीचा आकडा दररोज ५० हजारांच्या पुढे जात आहे. त्यामुळे काही घटकांतून लॉकडाऊन करावे तर काही घटकांतून लॉकडाऊन करू नये अशी मागणी होत होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवार व रविवारी लॉकडाऊन जाहीर केला. आज सायंकाळी 8 वाजल्यापासून हा २ दिवसांचा विकेंड लॉकडाऊन सुरु झाला आहे. राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेली नियमावली अशी -
- लसीकरण न झालेल्या व्यक्तींसाठी आरटीपीसीआर चाचण्या बंधनकारक केल्या होत्या . तिथे आता पर्याय म्हणून रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.
- महत्वाचे काम असेल तरच बाहेर पडत येईल अन्यथा महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू शकणार नाही.
- कोरोना नियमांचं पालन करत मार्केट सुरु राहणार.
- बांधकामासाठी वस्तू पुरवणारी दुकाने सुरु राहणार नाहीत
- गॅरेज सुरु राहतील, ऑटो पार्ट पुरवणारी दुकानं बंद राहतील.
- ज्या सेवा अत्यावश्यक सेवेत येतात त्या सोडून इतर केंद्र सरकारच्या सार्वजनिक सेवा क्षेत्रातील कंपन्यांचे कर्मचारी अत्यावश्यक सेवा पुरवठादार म्हणून समजले जाणार नाहीत.
- 4 एप्रिलच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेल्या वेळेत नागरीक दारु होम डिलिव्हरी पद्धतीनं खरेदी करु शकतात.
- रस्त्याशेजारील ढाबे सुरु असतील मात्र, तिथे देखील टेक अवे होम आणि होम डिलीव्हरी पर्याय उपलब्ध असेल.
- सेतू कार्यालय, नागरीक सेवा केंद्र सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असतील.
- रेस्टॉरंट आणि बार स्थानिक प्रशासनान लावलेल्या नियमांसह सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत फक्त पार्सल सुविधेसह सुरू असतील.
0 टिप्पण्या