Ticker

6/Breaking/ticker-posts

लाभार्थ्याना लाभ देण्यासाठी घरोघर जाणारे पहिले गटविकास अधिकारी ...!


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

साकत : -घरकुले लवकर पूर्ण करा अन्यथा शासनाचे पैसे परत जातील ज्या लाभार्थ्याला पहिला हप्ता मिळाला आहे त्यांनी घरकुलाचे बांधकाम करावे अन्यथा त्याच्यावर कडक कार्यवाही  करण्यात येईल. भाऊ - ताई - दादा  घरकुले बांधून प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी परशुराम कोकणी यांनी  थेट लाभार्थ्यांच्या घरी  जाऊन केली. त्यामुळे जामखेड तालुक्यात पहिलेच अधिकारी ठरले ज्यांनी घरी जाऊन लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यास सांगीतले 


आज साकत येथे  पंचायत समितीचे गटविकास अधिकारी परशुराम  कोकणी , विस्तार अधिकारी  कैलासभाऊ खैरे , माने  ,तंत्रीक विभागाचे सुजीत पवार, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वळेकर , मा. सरपंच हनुमंत पाटील ,हरिभाऊ मुरूमकर , ग्रामपंचायत सदस्य सागर मुरूमकर , यांना बरोबर घेऊन प्रत्येक घरकुल धारकाच्या घरी जाऊन त्यांची विचार पुस करून अडी-अडचणी समजुन घेतल्या व घरकुल पूर्ण करण्यास सांगितले  यावेळी रोजगार सेवक हरिभाऊ वराट ,रामहारी वराट , सतिष लहाने , नागराज मुरुमकर अदी उपस्थित होते. 

प्रधानमंत्री आवास योजना व सर्व राज्य पुरस्कृत आवास योजना गतिमान करणेसाठी राज्यात दिनांक १९ नोव्हेंबर २०२० पासून महाआवास अभियानाची सुरवात केली  यामध्ये १००%  'ब' यादीतील लाभार्थी यांना मंजुरी देण्यात आली असून  घरकुले अभियान कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  अभियानास  १ मे २०२१ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली असून त्यादृष्टीने  गावनिहाय पालक अधिकारी नेमले असून सर्वजण महाआवास अभियानातंर्गत घरकुले पूर्ण करण्यासाठी गावोगाव लाभार्थी मेळावे आयोजित करून लाभार्थीस घरकुल बांधण्यास प्रोत्साहित करीत आहेत. असे गट विकास अधिकारी परशुराम कोकणी यांनी सांगितले 

घरकुलधारकांनी घरकुले  लवकर पूर्ण करावे बांधकाम करतांना काही अडचण असल्यास सर्व सहकार्य करण्यात यईल असे सरपंच सौ. मनिषा पाटील यांनी सांगितले 


 [२०१६ पासून मंजूर  घरकुल बांधकाम केले नाहीत. त्यांनी त्वरित बांधकाम करावे  अन्यथा  निधी परत  केला जाईल ज्यांना घरकुला चा हप्ता आला आहे त्यांनी ही बांधकाम करावे अन्यथा हप्ता वसूल करण्यात येईल त्यासाठी कठोर कार्यवाही करण्याची वेळ आली तरी केली जाईल  असे जामखेड पं. समितीचे गट विकास अधिकारी परशुराम कोकणी यांनी सांगितले .]

[ जे अर्थिक दुष्ट्या गरिब आहेत त्यांना शासनाचे पैसे उपलब्ध होई पर्यंत घरकुलासाठी लागणारे सहित्या उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्यात  येईल  -मा. सरपंच हनुमंत पाटील ]

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या